पान:तुतीपासून रेशीम.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ साहित्याच्या खर्चाच्या सदरांत लागवडीप्रीत्यर्थ लागणारा खर्च दर्शविण्याचें कारण असें आहे कीं, लागवड नव्यानें तयार करतांना पहिलेच सालीं याप्रमाणें खर्च लागत असतो. पुढील सालापासून फक्त ती लागवड चांगल्या स्थितीत राहण्यासच तेवढा खर्च लागत असतो. एकदा लागवड केली, ह्मणजे पंचवीस ते चाळीस वर्षेपर्यंत टिकते. ह्मणून ह्या लागवडीस जो कांहीं पहिल्यानें खर्च येतो, तो काय- मच्या, ह्मणजे डेडस्टॉकच्या, खर्चात दाखविलेला आहे. बंगाली लागवड बरीच वर्षे टिकावी, असें वाटत अस- ल्यास प्रत्येक तीन वर्षांनी झाडांच्या एका बाजूच्या मुळ्यांची अजिबात छाटणी करावी, व त्यावर मातीची भर घालावी. अशा छाटणी केलेल्या जागीं पुन्हा नव्या मुळ्या फुटूं लागतात. नंतर तीन वर्षांनीं दुसऱ्या न तोडलेल्या बाजूची मुळे तोडीत जावींत. असे केल्यानें त्या झाडांची मुळें जमिनीत मोठ्या प्रमाणांत पसरत नाहींत, व जमिनींत त्यांचें जाळे होत नाहीं. मुळे छाटतांना मध्यमूळ मात्र कायम ठेवावे. याप्रमाणें वरचे वर मुळ्यांची तासणी करीत गेल्यास " बंगाली लागवड बरीच वर्षे टिकते. बंगाली लागवड सखल जागेंत करीत जावी. बंगाली तऱ्हेच्या लागवडीस दरसाल मातीची भर द्यावी लागत असते. अनेक वर्षांच्या भरीने लागवडीखालील जमीन चढीची होत जाते. सखल जमीन भर घालून अवांतर जमिनीच्या उंचवट्याची करावयाची असल्यास त्यांत बंगाली