पान:डी व्हँलरा.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निवेदन. या वर्षी ‘ विजय साहित्या'ची चार पुस्तकें काढण्याचा आमचा मूळचा विचार कांहीं अकल्पित कारणामुळे सिद्धीस गेला नाही. मॅस्विनी'चे चरित्र प्रकाशित केल्यानंतर डी व्हॅलेराचे चरित्र छापण्याच्या कामास आम्ही प्रारंभ केला. परंतु त्या चरित्राचा असा कांहीं योगायोग आला, की चरित्र-लेखकांनी त्याचे शेवटचे प्रकरण लिहावे व तें छापण्यास घ्यावें तोंच आयर्लंडांत कांहीं तरी विलक्षण घडामोड घडून यावी; असे दोन वेळां झालें. शेवटीं आतां अधिक थांबावयाचे नाहीं असे ठरवून लेखकांनी चरित्र पुरे केले तरी इतका विलंब झाला, व वर्ष अखेर दोनच पुस्तकें मालेच्या आश्रयदात्यांना देऊन समाधान मानणे आम्हांस प्राप्त झाले. याबद्दल आम्ही आमच्या आश्रयदात्यांची क्षमा मागतो. पुढील वर्षी त्यांची अधिक सेवा आमच्या हातून घडेल असा आम्हांस भरंवसा आहे. या पहिल्या दोन पुस्तकांप्रमाणेच मालेची पुढचींही पुस्तकें अंतर्बाह्य सुंदर होतील हे आमच्या परिचत आश्रयदात्यांना व वाचकांना निराळे सांगावयास नकोच. व्यवस्थापक, ‘विजय साहित्य.