पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८० झानेश्वरवचनामृत. [६१५६ १५६. ईश्वरास प्रियतम कोण? जे न सांगेचि पितया वसुदेवासी। जे न सांगेचि माते देवकीसी। जे न सांगेचि बंधु बळिभद्रासी । ते गुह्य अर्जुनैसी बोलत ॥ .. देवी लक्ष्मी येवढी जवळिक । तेही न देखे या प्रेमाचे सुख । आजि कृष्णप्रेमा बिक । यातेचि आथि॥.. सनकादिकांचिया आशा । वाढीनल्या कीर बहुवसा । परि त्याही येणेमाने यशा । येतीचिना ॥ या श्रीजगदीश्वराचे प्रेम । एथ दिसतसे निरुपम । कैसे पार्थे येणे सर्वोत्तम । पुण्य केले ॥ ज्ञा, ४. ८-११. . १५७. " तो वल्लभा मी कांत । ऐसा पढिये." तो सर्वभूतांच्या ठायीं । द्वेषाते नेणेचि कहीं। आपपर नाहीं । चैतन्या जैसा ॥ उत्तमाते धरिजे । अधमाते अव्हरिजे। हे काहींचि नेणिजे । वसुधा जेवीं ॥...॥ गाईची तृषा हरूं । व्याघ्रा विष होऊनि मारूं। ऐस नेणेचि गा करूं । तोय जैसे॥ तैसी आघवियांचि भूतमात्रीं । एकपणे जया मैत्री। कृपेसी धात्री । आपण जो ॥ आणि मी हे भाष नेणे । माझे कांहींचि न म्हणे । सुखदुःख जाणणे । नाहीं जया ॥ तेवींचि क्षमेलागी । पृथ्वीसी पवाड आंगीं। ...... संतोषा उत्संगी। दिधले घर ॥... जीध परमात्मा दोन्ही। बैसले एकासनी।" - १ बळ. २ याच्यामानाने. ३ पृथ्वी, आधार. ४ योग्यता. ५ मांडीवर,