पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६७६ ] नीतिविचार. ७५. अनासक्ति. तरि जो या देहावरी । उदास ऐसिया परी। उखिता जैसा बिढारी । बैसला आहे ॥ कां वृक्षाची साउली । वाटे जातां मिनली। घरावरी तेतुली । आस्था नाहीं॥ साउली सरिसीच असे । परी असे हे नेणिजे जैसें । स्त्रियेचे तैसे । लोलुप्य नाहीं॥ आणि प्रजा जे जाली । तिये वस्तीकरें आलीं। कां गोरुवे बैसलीं। रुखातळीं ।। जो संपत्तिमाजी असतां । ऐसा गमे पांडुसुता। जैसा कां वाटे जातां । साक्षी ठेविला ॥ किंबहुना पुंसाँ । पांजरियामाजि जैसा। वेदाशेसी तैसा । बिहूनि असे ।। ज्ञा. १३. ५९४-५९९. . ७६. एकांतप्रियता. आणि तीर्थं धौते तटें । तपोवने चोखटे । आवडती कपाटें । वसवू जया ॥ शैलकक्षांची कुहरें । जलाशये परिसरें। अधिष्ठी जो आदरे । नगरा न ये॥ बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदाची खंती। जाण मनुष्याकारे मूर्ति । ज्ञानाची तो॥ ज्ञा. १३. ६१२-६१४. १ अतिथि. २ प्राप्त झाली. ३ तेवढी. ४ बरोबरच. ५ वाटसरू. ६ गुरे. ७ पोपट. ८ पिंजऱ्यांत. ९ पवित्र. १० गुहा. ११ पर्वतांच्या बाजूंची. १२ गुहा. १३ तलाव. १४ जवळची स्थळे. १५ लोकसमुदायाची.....