पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तत्त्वज्ञान. ६०. चित्र्याचे अप्रतिम वर्णन...... मावळवीत विश्वाभास । नवल उदयला चंडांश। अद्वयाब्जिनीविकाश । वदूं आतां ॥ जो अविद्याराती रुसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणियां । जो सुदिन करी ज्ञानियां । स्वबोधाचा ॥ जेणे विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे। सांडिती देहाहंतेची अविसाळे । जीवपक्षी । लिंगदेहकमळाचा । पोटीं वेचतया चिभ्रमराचा। बदिमोक्ष जयाचा । उदैला होय ॥ शब्दाचिया आर्सकडीं । भेदनदीच्या दोहीं थडी। आरडत विरहवेडी । बुद्धिबोध ॥ तया चक्रवाकांचे मिथुन । सामरस्याचे समाधान । भोगवी जो चिद्गगन-। भुवनदिवा ॥ जेणे पाहालिये पाहांटे । भेदाची चोरळी फिटे। . रिगती आत्मानुभववाटे । पार्थिक योगी । जयाचेनि विवेककिरणसंगें । उन्मखसूर्यकांत फुणगे। दीपले जाळिती दांगें । संसाराची॥ जयाचा रश्मिपुंज निबर । होतां स्वरूपउँखरी स्थिर । ये महासिद्धीचा पूर । मृगजळ ते ॥ जो प्रत्यग्बोधाचिया माथया । सोहंतेचा मध्यान्हीं आलिया। लपे आत्मभ्रांतिछाया । आपणपां तळीं ॥ ते वेळी विश्वस्वप्नासहित । कोण अन्यथामती निद्रेते। सांभाळी नुरेचि जेथे । मायाराती॥....॥ १ उजाडण्याच्या. २ वेळेला. ३ मिळून. ४ घरी. ५ क्षय, नाश. ६ अंड. चणीच्या जागेत. ७ तीरांवर. ८ चोखटा. ९ मार्गस्थ. १० ज्ञान. ११ ठिणग्या टाकितो. १२ प्रखर. १३ माळ जमिनीवर.