त्यामुळे ही मतें जातिरूप खांचरांमध्ये वळाने फोफावतात. ज्या जातीला जी दैवतें व जी क्रियाकमें आवडली ती तिने आदरली, जो आचार गोड लागला तो चालविला, व जो गुरु वरा दिसला तो तिने केला; एका जातीच्या पंथांत कि- तीही अनाचार व असद्विचार असले तरी दुसऱ्या जातीचे लोक त्यांत मन घालीत नाहीत, व ते सुधारणे हे आपले कर्तव्य आहे असे समजत नाहीत. येणेकरून बहुत अज्ञान व मूट विचार व असद्भक्ति लोकांत चालू लागली. जे जे कोणी धर्म सुधारणारे झाले ते बहुधा आपल्या जातीपुरते झाले व त्यांचे वजन इतरांवर क्वचित् पडले. तसेंच लोकांत एको नसल्यामुळे जनहितांची कार्ये करण्याची त्यांची इच्छा व शक्ति नष्ट झाली. सार्वज- निक मत किंवा अभिप्राय ह्मणजे काय व त्याचे वजन किती आहे हे हिंदु लोकांस ठाऊक नाही. अमुक काम केलें असतां जात काय ह्मणेल, अमुक न केले असतां जात हंसेल असे विचार मात्र लोकांच्या मनांत येतात. जातीच्या भयाने कोणी सार्वजनिक कार्याला हात घालीत नाहीत, व जनहिताचे एखादें महत्कार्य करायास कोणाचें मन
पान:जातिभेदविवेचन.pdf/३७
Appearance