Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. प्रकरण १. जातिभेदापासून तोटे. ह्या पुस्तकाच्या पहिल्या भागांत जातिभेद किती गो- ष्टींच्या विरुद्ध आहे हे आह्मी दाखविले, आणि तेवढ्यावरून सर्व विचारी व निष्पक्षपाती वाचकांची खातरी होईल की तो सर्व प्रकारे वाईट आहे. तथापि झाडावरून फळ ओळ- खावें अशी जी ह्मण आहे तिच्या न्यायाप्रमाणे ह्या जाति- रूप वृक्षाच्या फळांची परीक्षा केली असता त्याचे वास्तविक लक्षण विशेष समजण्याजोगे आहे. हा विचार मनांत आ- णून ह्या भागांत जातिभेदापासून कोणकोणते तोटे होतात हे दाखवितों, त्याकडे वाचकांनी लक्ष द्यावें. १ पहिला तोटा असा आहे की, देशांत एकी नाही. ह्या हिंदुस्थानाला एक नांव आहे, त्याचा धर्म एक आहे, व याला एक शास्त्र आहे असे जरी मानिले आहे, तथापि जा.३ . .