Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३ "जो विश्वास वरील तो तरेल." "जो कोणी तान्हेला आहे तो येवो, आणि जीवनाचे पाणी फुकट पिवो," असें तो ह्मणतो. स्त्रीस्त सद्गुरु जे अत्यंत नीच व पापी त्यांसहि जे जवळ घेतो व त्यांस आपले पुण्य व पवित्र आत्मा देऊन पुण्यवान व पवित्र करितो. ह्या ईश्वरी अवताराने जातिसं- बंधी भक्ष्याभक्ष्याच्या नियमांविषयीं असें शिकविले की, “जें मनुष्याच्या पोटांत जातें त्याकडून मनुष्य बाटत नाही, तर जी त्याच्या अंतःकरणांतून दुष्टाई निघते ती त्याला भ्रष्ट करिते." "पाप्यांचा मित्र" त्याचे हे एक नांव आहे. तो जगांत असतां जे जातिभ्रष्ट मानिलेले होते त्यांच्या घरी तो भोजनास जाई, नीच मानिलेले कोळी व जकातदार यां- च्यांतून त्याने आपले प्रथम शिष्य निवडिले, व त्यांस अनु- ग्रह देऊन आपल्या पवित्र धर्माचे प्रेषित केले, व त्यांनी जातिभेद न मानितां सर्व जनांस शुभवर्तमानाचा उपदेश करावा अशी आज्ञा दिली. आतां त्याजवर विश्वास ठेवून जे त्याचे शिष्य होतात ते जातिभेद मानीत नाहीत व जा- त्याभिमान बाळात नाहीत. ते सर्वांस मानव कुळांतील आ- पले भाऊ समजतात, व जे त्यांच्याप्रमाणे खीस्तावर विश्वास ठेवितात त्यांस ते आपले ख्रिस्तीभाऊ असे समजतात. .