Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८ . ३ धर्मसंबंधी क्रिया, विधि, व सणवार हे देखील जाति- भदामुळे अनेक झाले आहेत. मराठ्यांचे सण निराळे, गुजरा- थ्यांचे निराळे, तेलंगी लोकांचे निराळे, व मद्राशी लोकांचे निराळे, भंग्यांचे निराळे, व कोळ्यांचे निराळे. ब्राह्मणांच्या बायका जी व्रतें पाळतात ती कुणब्यांच्या स्त्रिया आचरीत नाहीत, बिचाऱ्या चांडाळ जातीस सोळासोमवारांशिवाय दुसरें व्रत आचरण्याचा अधिकार नाही. काही दिवसांमागे एका ब्राह्मणानें चांभाराच्या घरी सत्यनारायणाची पूजा सांगितली त्याला दुसऱ्या ब्राह्मणांनी बहिष्कृत केलें ! ४ हिंदूंची कित्येक देवळे आहेत त्यांत शूद्रादिकांस जाण्याची मोकळीक नाही, ब्राह्मणाच्या घरांतील देवघरांत तर त्यांची सावलीही पडायाची नाही. ब्राह्मणाच्या खालो- खाल ज्या जाती आहेत त्यांतूनही कोणास तेथें प्रवेश कर- ण्याची परवानगी नाही. शूद्रादिकांनी बांधलेले देऊळ एकदा ब्राह्मणाच्या हाती गेले की, तो तेथला राजा झाला, तेथें सणावारी देवकार्यास ब्राह्मण मंडळी जमली ह्मणजे शूद्राला दूर उभे राहावे लागते, आणि वास्तविक पाहतां देवळाचा मालक शूद्र असतो. देवाच्या मूर्तीचा पुजारी शूद्र असला .