Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जातिभेदविवेचन. भाग पहिला. प्रकरण १. जातिभेद सृष्टिविरुद्ध आहे. . +0+ पशु पक्षी व वनस्पति यांच्या ईश्वरानें जशा भिन्न भिन्न जाति केल्या आहेत व तें भिन्नत्व दर्शविण्याकरितां त्यांजमध्ये जी गुणलक्षणे ठेविली आहेत तशा प्रकारे मनु- प्यांमध्ये जो कित्येक देशचे लोक जातिभेद मानितात त्यांत कांही नाही. पश्वादिकांच्या जातीकडे पाहिले असता त्यांचा वर्ण, रूप, आकार ही परस्परांपासून इतकी भिन्न आहेत की, ती जात ओळखण्यास कांहीं आयास किंवा अडचण पडत नाही, कारण हा भेद ईश्वरकृत व स्वाभाविक आहे, परंतु मनुष्य जातीमध्ये अशा काही खुणा नसल्यामुळे ती ईश्वर- कृत व स्वाभाविक नाही असें सहज अनुमान होतें.