Jump to content

पान:जातिभेदविवेचन.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ ब्राह्मणाप्रमाणे पूज्य मानीत नाहीत. यामुळे सद्गुणाचे मोल देशांत फार कमी झाले आहे. ( मनु. ९. ३१७ पाहा.) त्याप्रमाणेच विद्येविषयीं. ब्राह्मण खेरीजकरून कोणी शास्त्राध्ययन केले तरी त्याला शास्त्री ही पदवी मिळायाची नाहीं, अथवा त्याजपासून कोणी उंच जातीचा मनुष्य पाठ घेणार नाही. ब्राह्मण लोक इतर जातीला साधे संस्कृत दे- खील शिकवायास मान्य नसतात, पोटासाठी ह्मणून शिक- वितील, परंतु जातिधर्माप्रमाणे तसे करणे निषिद्ध आहे. ब्राह्मण पंतोजी आपल्या शाळेतील शूद्रादिकांच्या मुलांस मन लावून शिकवीत नाही, याचे कारण जात. ब्राह्मणा- पेक्षां कोणी विद्वान व्हावें, अथवा ब्राह्मणाच्या बरोबरीचें तरी व्हावे असे त्याच्या मनांत नसतें. नीच मानिलेल्या जातीस असे वाटते की, नीच वृत्तीने राहणे हा आपला जातिधर्म किंवा जातिगुण आहे, व आपण कितीही चांगले झालों तरी आपणाला सन्मान मिळायाचा नाही, देवाने आपणाला नीचच केले आहे तेव्हां आपण उंच कोठून होऊं ? अशा विचाराने नीति व सदाचार यांचे मोल कमी होऊन त्यांचा हासही होतो. ८ नीतीचा अणखी एक नियम असा आहे की, न्या- .