पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उधळून टाकायची हे आपल्याच हातात आहे. म्हणून हे आयुष्य आरोग्यदायी ठेवण्यासाठी खाण्यायोग्य तेच खावे, पिण्यायोग्य तेच प्यावे आणि खाण्यापिण्याबरोबर नियमित व्यायामही करावा. कारण जे खाल्ले जाते ते नीट पचायला हवे. व्यायाम न करणाऱ्यांबाबतीत आहार समतोल असूनदेखील कोणत्या ना कोणत्या व्याधींना त्यांना तोंड द्यावे लागते. पान का सडते? घोडा का अडतो? भाकरी का करपते ? उत्तर : 'न फिरविल्यामुळे'. याच धर्तीवर पुन्हा काही प्रश्न : पोट का बिघडलं? पाठ का आखडली? रक्तदाब का वाढला ? उत्तर तेच. न फिरविल्यामुळे! अर्थातच आपल्या शरीराला फिरवले पाहिजे, म्हणजेच नियमित, सुयोग्य असा व्यायाम घेतला पाहिजे. म्हणून चांगले खावे; सात्त्विक खावे; नियमित व्यायाम करावा; चांगलेचुंगले जगावे आणि हे सुंदर जीवन आरोग्यसंपन्न करावे. ९० । जगण्यात अर्थ आहे..