पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खाणाऱ्याने खात जावे, पण.... ‘आपण काय खाता?' असा प्रश्न कुणी कुणाला केला तर, काय खावे आणि काय खाऊ नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर स्वत:च द्यावे असा कदाचित निकालात निघणारा प्रश्न असू शकेल. तरीही, या प्रश्नाचे आपण स्वत:ला दिलेले उत्तर योग्य आहे की अयोग्य हे ठरवून त्याला दिशा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करायला काय हरकत आहे? 'मी काय खातो आणि अर्थातच पितो?' हा प्रश्न आधी स्वत:ला करावा आणि बेड टी ते स्वीट डिंक्सपर्यंतचा आपला 'खाद्यप्रवास' आठवावा. चहा-कॉफीपासून नॉनव्हेजपर्यंत पिण्या- खाण्याचे असे अनेक पदार्थ आहेत की त्यांबद्दल आपण वाचतो, ऐकतो. त्यांचे खाणाऱ्याने खात जावे, पण... । ८७