पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गढूळ होतात. विचार गढूळ झाले की विवेक नष्ट होतो. विवेक नष्ट झाला की, आचार भ्रष्ट होतो. आचारभ्रष्टाची किंमत जगात शून्य असते. पैसा मिळविताना कोणाचा संसार उघड्यावर पडतो का, कोणावर बेकारीची कुन्हाड कोसळते का, कोणाची उपासमार होते का, कोणावर कर्जाचा डोंगर कोसळतो का, कोणी दुःखी-कष्टी होतो का, कोणाच्या मनाला यातना होतात का.... याचा विचार शहाण्या माणसाने करावयास हवा. गरजेपुरता पैसा मिळविणे ही फार कठीण गोष्ट नाही. एखादा सामान्य बुद्धीचा माणूसदेखील तो मिळवू शकतो. खूप पैसा मिळविण्याचा अनेकांना मोह होतो. माणसाला पैशाचा मोह हो नैसर्गिक आहे. पण त्या मोहापासून दूर राहण्यात मोठेपण आहे. माणुसकी आहे. पैसा मिळविताना एखाद्या व्यक्तीची, समाजाची ससेहोलपट होणार असेल तर त्या व्यक्तीकडून, समाजाकडून पैशाबरोबर शिव्या - शाप मिळण्यापेक्षा आपल्याला मिळणाऱ्या पैशाचा थोडाफार त्याग करून त्यांचे आशीर्वाद मिळविणे कधीही इष्ट असते. कारण अशी परोपकारी वर्तणूक आपल्याला मानसिक स्वास्थ्य, आत्मिक समाधान देऊन जाते. याबाबतची एक गोष्ट आपल्याला बरेच काही सांगून जाते. धनाजीराव एक कोट्यधीश गृहस्थ होता. तो एकदा देवेंद्र महाराजांकडे गेला. म्हणाला, “महाराज, माझ्याकडे खूप पैसा-संपत्ती आहे. पण मनाला शांती नाही, समाधान नाही. यातून मला मार्ग दाखवा.' >> महाराजांनी शांतपणे इकडे-तिकडे पाहिले. शेजारी पडलेला काचेचा तुकडा उचलला. शिष्याला हाक मारली आणि छोटासा आरसा आणावयास सांगितला. महाराज म्हणाले, “धनाजी हा काचेचा तुकडा घे. या काचेच्या तुकड्यातून माझ्याकडे बघ. जगाकडे बघ. याला कोणताही रंग नाही, लेप नाही. अगदी पारदर्शक काच आहे ही.' धनाजीने आज्ञापालन केले. >> माणूस 'पण' मिळवा । ७९