पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

असतो. या गंभीर विषयावर लिहिताना ते म्हणतात- आयुष्यात प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. ते स्वत: घडवून आणलेल्या गोष्टींना तर असतोच असतो. आत्महत्या केली की समस्या सुटेल अ काही व्यक्तींना वाटते. ती तर सुटत नाहीच; पण आत्महत्या करणाऱ्या कुटुंबावर नवीन संकटं कोसळतात. 'परमेश्वराने दिलेल्या प्राणाची हत्या करणे म्हणजे, परमेश्वराचा अपमान करणे होय. ' भारतात अनंत हाल-अपेष्टांत जगणाऱ्या माणसापेक्षा आत्महत्या करणाऱ्या माणसाचे दु:ख मोठे असणार नाही. देशाचा विचार करता, स्वत:च्या व्यक्तिगत संकटासाठी आत्महत्या करणे अत्यंत गैर आहे. मी जर समर्थ असेन तर माझे प्रश्न मी सोडवू शकेन. त्यासाठी आत्महत्या करण्याची गरज नाही असा विश्वास प्रत्येक हताश माणसाने बाळगणे गरजेचे आहे. आत्महत्त्येला इतर अनेक समाजोपयोगी पर्याय उपलब्ध असतात. त्यांचा विचार करणे योग्य ठरावे. हे सर्व विचार योग्य, उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरणारे आहेत. डॉ. अनिल मडके यांचे आपण ऋणी असले पाहिजे. कारण ते आपणा सर्वांचा प्रामाणिकपणे विचार करतात. अन्यथा त्यांना हा लेखनप्रपंच करण्याची व्यक्तिगत गरज मुळीच नव्हती आणि नाही. डॉ. अनिल मडके यांच्या या संपादकीय लेखांच्या संग्रहात, एका समंजस, समाजमनस्क, तरुण डॉक्टरचे सर्वसामान्य माणसांचे सुखस्वास्थ्य आणि आनंद यांचा स्वनिरपेक्ष शोध घेणारे मन प्रतिबिंबित झाले आहे. डॉक्टरांची शैली सुबोध आहे. ते वैद्यकीय परिभाषांचा उपयोग नाहीत आणि आपले म्हणणे वाचकांना पटवून देण्यासाठी उदाहरणांचा, आठवणींचा, छोट्या कथा-हकीकतींचा रंजक उपयोग करतात. मार्गदर्शनपर विचार मांडताना ते आदेशवजा विधाने न करता, आर्जवी स्वरांतील प्रेमळ आवाहने करतात. त्यामुळे वाचकांत नाराजी अगर रोष उत्पन्न होण्याची शक्यता उरत नाही. 'इसापनीती' सारख्या आधुनिक बोधकथाही ते सहजपणे सांगून जातात. नियतकालिकाच्या मर्यादेमुळे हे लेखन आटोपशीर करावे लागलेले आहे. आपल्या विचारांची विस्ताराने मांडणी करणारे लेखन त्यानी करावे असे सुचवावेसे वाटते. म. द. हातकणंगलेकर । ७