पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नसतात. आपला जोडीदार नक्की कसा असावा याचे स्पष्ट चित्र मनात असत नाही. तसे चित्र कोणी मनात उभे करू पाहत असल्यास त्याला दुजोरा मिळतोच असे नाही. बहुतेक वेळा आपल्या आईवडिलांचे विचार, आचार, त्यांचे जीवनमान, राहणीमान, सभोवतालच्या व्यक्तींकडून- वडीलधाऱ्यांकडून - मित्रमैत्रिणींकडून मिळणारे अनुभव, सल्ले, दूरदर्शन - सिनेमा - नियतकालिके यांसारख्या माध्यमांतून मिळणारे संदेश, ज्यांच्यावर आपली निष्ठा आहे अशा व्यक्तींची मते तसेच पूर्वायुष्यात भेटलेली व्यक्तिमत्त्वे या सर्वांचा परिपाक म्हणून, स्वत:च्या विवाहाविषयी कल्पना अथवा स्वप्नरंजन करून निर्णय घेतला जातो. जोडीदाराची निवड करीत असताना बऱ्याचदा शारीरिक सौंदर्याकडे कटाक्ष असतो. म्हणजेच येथे बाह्यांगाकडे किंवा बाह्य रंगरूपाकडे जास्त लक्ष दिले जाते. व्यक्तीच्या अंतरंगाकडे पूर्णतया दुर्लक्ष केले जाते, सद्गुणांकडे दुर्लक्ष केले जाते. शरीररस्य गुणानांच दूरम् अत्यंतम् अंतरम् शरीरं क्षणविध्वंसी, कल्पांतस्थायिनो गुणाः शरीर व गुण यांच्यामध्ये फार मोठे अंतर असते. शरीर हे क्षणभंगूर असते तर गुण हे कल्पांतापर्यंत टिकणारे असतात. गुणांना मरण नाही. मृत्यूनंतरही माणसाचे गुण म्हणजे कीर्ती चिरंतन राहते. प्रत्येक व्यक्ती ही तीन वेगळ्या वर्तुळांत वावरत असते. कुटुंब आणि त्यातील व्यक्ती, व्यवसाय आणि त्याच्याशी निगडीत सहकारी व तिसरे म्हणजे मित्रमंडळी. मात्र विवाहाच्या बाबतीत या तिन्ही वर्तुळांतील जवळजवळ प्रत्येक व्यक्ती एखाद्याच्या विवाहाच्या बाबतीत तशी वर्तुळाबाहेरच असते. म्हणजेच विवाहासंदर्भातील निर्णय ज्याचा त्याने घ्यावा अशी भूमिका या वर्तुळातल्या व्यक्तींची असते. स्वत:च्या विवाहाच्या बाबतीत इतरांचा सल्ला घेत असताना 'विवाह माझा होणार आहे, मला काय आवडते, माझा स्वभाव कसा आहे, जोडीदाराचा स्वभाव कसा असावा, ७० । जगण्यात अर्थ आहे..