Jump to content

पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

निसर्गाने एखाद्या व्यक्तीला बहाल केलेले सौंदर्य जर त्या जीवाचे अस्तित्वच हिरावून घेत असेल तर ते सौंदर्य काय कामाचे? हा दोष सौंदर्याचा की समाजाचा याचाही विचार होणे तितकेच गरजेचे आहे. समाज ही काही स्वतंत्र वस्तू नाही. समाज याचा अर्थ समाजातील घटक. समाजातील घटक हलले तरच समाज सर्वार्थाने हलतो. समाज निरोगी बनविण्यासाठी अनेक घटकांच्या सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. पालक, शिक्षक आणि वेगवेगळी प्रसारमाध्यमे या संस्कार करणाऱ्या घटकांनी अंतर्मुख होऊन यासाठी कार्यान्वित होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने आपला दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. 'शरीराला जसे सौंदर्य असते, तसे मनालाही असते.' या विचाराचा अंतर्भाव प्रत्येकाच्या मनात होणे गरजेचे आहे. शरीराचे सौंदर्य हे कोणा व्यक्तीच्या हातात नसते. ते आपल्या आईवडिलांकडून मिळते. आनुवंशिक असते. त्यात स्वत:च्या कर्तृत्वाला फारसा वाव नसतो. मनाचे सौंदर्य आपण स्वतः घडवू शकतो. आयुष्याच्या वाटेवरील अनुभवांची प्रसाधने मन अधिक संपन्न, सुंदर करू शकतात. वाढत्या वयाबरोबर शरीराचे सौंदर्य घटत जाते. तुकतुकीत, टवटवीत त्वचेची जागा सुरकुत्या, स्वत:च्या डोळ्यांदेखत बळकावतात. मनाचे सौंदर्य मात्र वाढत्या वयाबरोबर वाढत जाते, संपन्न होत जाते. त्याला सुंदर विचारांची, अनुभवांची झालर जोडली जाते. शरीराचे सौंदर्य हे आपल्या व्यवसायाचे भांडवल असेल तर आपला व्यवसाय नक्कीच मंदीत येऊ शकतो. जेथे मनाची बाजू महत्त्वाची असते तेथे सदैव तेजी असते. आजच्या जाहिरातयुगात वेष्टणातील जिनसाहून वेष्टणालाच अधिक महत्त्व आले आहे. त्यामुळे डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएटपासून अन्स्कील्डपर्यंत सर्वच टप्प्यांवर आंतरिक, मानसिक सौंदर्यापेक्षा शारीरिक सौंदर्यालाच अधिक भाव आहे. वाव आहे. सुंदर दिसणारी प्रत्येक गोष्ट चांगली असतेच असे नाही. बऱ्याचदा पाप इतका सुंदर पोशाख येते की, ते पाप आहे हे माहीत असूनही त्याला आपण हृदयाशी कवटाळतो. दुष्ट वृत्ती, घालून नजर सुंदर हवी । ६१