पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५४ । जगण्यात अर्थ आहे.. सुख कशात? ‘तुम्ही सुखी आहात का?’ असा थेट प्रश्न शक्यतो कोणी कोणाला करीत नाही. एवढेच नाही तर हा प्रश्न आपण स्वतः देखील स्वत:ला विचारत नाही. 'मी सुखी आहे का?' 'आपण जे जगतोय ते बरोबर जगतोय 'आपल्याला जे करायचंय तेच करतोय का?' असे प्रश्न आपल्याला कधी पडत नाहीत. 'पडत नाहीत' म्हणण्यापेक्षा अशा प्रश्नांचा विचार करायला आपल्याकडे वेळच नसतो. कारण प्रत्येकजण आपल्या व्यापात, संसारात - प्रपंचात गुंतलेला असतो. प्रपंच! मी, माझी बायको, माझे आई- वडील, माझी मुले, माझी भावंडे... अशी का?'