पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चेहऱ्याला ‘हसू’ द्या आरसा...! एखाद्या दिवशी आरसा नाही मिळाला तर आपण बेचैन होतो. दिवसाच्या प्रारंभीच आपण आरशात पाहतो. चेहरा व्यवस्थित-ठाकठीक आहे की नाही याची खात्री करूनच आपण बाहेर पडतो. परंतु एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो की, आपला चेहरा आपण सोडून इतर सर्वजण जास्त काळ पाहत असतात. त्यांना तो आवडतो का? भावतो का? खरे तर चेहरा हाच एक आपल्या मनातल्या विचारांचा अंतर्मनाचा आरसा असतो. मनात जे काही विचार चालले असतील, त्यांनुसार चेहऱ्यावरचे भाव बदलत असतात. म्हणून चेहरा नेहमी हसतमुख, हसरा ठेवण्यासाठी मन उत्साही, आनंदी, समाधानी ठेवले पाहिजे. चेहऱ्याला 'हसू' द्या । ३७