पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

" आधीच्या लोकांचे काही तरी हरवले म्हणून शोधाशोध सुरू केली. अशा रीतीने लोकांची रस्त्यात गर्दी जमली. एका सद्गृहस्थाने ही गर्दी पाहून दुसऱ्याला विचारले, “तू काय शोधत आहेस?" “नेमकं माहीत नाही. काही तरी हरवलंय. सर्वजण शोधत आहेत, म्हणून मी शोधतोय." सद्गृहस्थाला आश्चर्य वाटले. त्याने इतरांना देखील हाच प्रश्न विचारला. उत्तर असेच मिळाले. शेवटी म्हातारीला विचारले. ती उत्तरली, “सुई हरवली, ती शोधत आहे.” “कुठे हरवली?" त्याने विचारले. “घरात!" म्हातारी म्हणाली. " “मग रस्त्यावर कशाला शोधतेस? घरात शोध. ' ती म्हणाली, “मी घरात शोधत होते. पण तुझ्यासारख्या शहाण्याने मला उजेडात शोधायला सांगितले. म्हणून मी उजेडात सुई शोधत होते. ' >> सुई घरात हरवली असेल तर ती रस्त्यावर शोधणे जसे वेडेपणाचे आहे, तसेच सुख आपल्या अंतरंगात असताना त्याचा बाहेर शोध घेणे वेडेपणाचे असते. खरे सुख हृदयात आहे, बाहेर दुःख भरलेले आहे. सुखाचा शोध घेताना अंतर्मुख होऊन याचा विचार करायला हवा. कोणतीही दोन माणसे एकमेकासारखी नसतात. प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वतंत्र असे 'विश्व' असते. ती व्यक्ती सतत त्या विश्वात वावरत असते. त्याप्रमाणे त्या व्यक्तीची प्रवृत्ती बनते. विचार बनतात. त्या विचारांना अनुसरून ती वागते. त्या विचारांचा, त्या व्यक्तीच्या वागण्यावर, बोलण्यावर परिणाम होतो आणि नेमके हेच आपण विसरतो. आपल्या समोरची व्यक्ती ही आपल्यापेक्षा 'वेगळी' आहे, ती व्यक्ती तिला जसे वाटते तशी वागत असते. 'त्या व्यक्तीने माझ्या म्हणण्यानुसार वागले पाहिजे' हा हट्ट आपण सोडल्यास सामान्य गोष्टींमध्येही संघर्ष, मतभेद, तणाव, भांडण निर्माण होणार नाही. 'माझ्या मनाप्रमाणे सर्व व्हायला पाहिजे' ही भावना एकदा का डोक्यातून काढून टाकली की जवळपास अर्धी लढाई जिंकली असे समजावे. २० । जगण्यात अर्थ आहे..