पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ । जगण्यात अर्थ आहे.. जगण्यात अर्थ आहे ‘आमच्या जगण्यात काय अर्थ आहे?? असे अनेक लोक म्हणत असतात. कारण 'जगताना' त्यांना जे अनुभव येतात ते डोके सुन्न करून जात असतात. डोळ्यांसमोर घडणाऱ्या घटना मनाला यातना देत असतात. दुराचारी लोक समाधानात जगत असतात, तर सदाचारी लोकांवर यातना भोगायची पाळी येते. इतरांसाठी झिजणाऱ्या, प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यातील उताराची वर्षे हाल-अपेष्टा, कष्टांत जातात तर आयुष्यभर लबाडी करणाऱ्यांच्या वाट्याला मानसन्मान येतात. वर्षभर अभ्यास करून प्रामाणिकपणे ज्ञानार्जन करणाऱ्या विद्यार्थ्यास 'नो व्हेकन्सी' ला तोंड देऊन इच्छेविरुद्ध नको त्या कॉलेजमध्ये अथवा कॉलेजबाहेर शिकावे लागते; तर अक्कल नसलेल्या धनवान पुत्रास पालकांच्या