पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लेजिओनोरिस, १९८१ मध्ये एड्स, १९८९मध्ये एर्लिकीऑसिस, त्यानंतर इबोला विषाणूसंसर्ग, सार्स, बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लू अशी काही प्रमुख उदाहरणे देता येतील. संसर्गजन्य रोगांपासून आपली सुटका झाल्याचा आपला भ्रम होता, याची खात्री आता पटत चालली आहे. माणसाचा पर्यावरणातील हस्तक्षेप, प्रदूषण, गरिबी आणि लोकसंख्याविस्फोट अशा अनेक कारणांमुळे संसर्गजन्य रोगांची वाढ झालेली असली तरी सार्वजनिक आरोग्याबद्दलची अनास्था हा त्यातील एक प्रमुख घटक म्हणून नमूद करता येईल. आज कोणत्याही खेड्यात प्रवेश करताना दिसणारे रस्त्यांचे जे चित्र असते ते काय दर्शविते? आज-कालच्या शहरांची आणि नवनवीन उपनगरांची परिस्थिती याहून वेगळी नाही. एवढेच कशाला आपण राहत असलेल्या ठिकाणाला केंद्र मानून एक किलोमीटरची त्रिज्या पकडून परीघ काढला तर या परिघात हे चित्र कुठे ना कुठे नक्कीच सापडेल. काय असते हे चित्र? कचऱ्यांचे ढीग, कागदांचे तुकडे, उघडी वाहणारी गटारे, प्लॅस्टीकच्या रिकाम्या पिशव्या, कचऱ्याभोवती शेळ्या-गाई - डुकरे - गाढवे-मोकाट हिंडणारी कुत्री, रस्त्यांवरून त्यांची होणारी , त्यांचे ओलेसुके मलमूत्र, रस्त्यावरील लहान-मोठे खड्डे, रस्त्यावरच वाहणारे आणि खड्ड्यात साठणारे पाणी आणि यांवर कळस म्हणजे रस्त्याकडेला विधी उरकणारे लहान-थोर ! उघड्यावर मलविसर्जन करणारे सर्व वयोगटांतील महाभाग केवळ संधिप्रकाशात नव्हे तर टळटळीत उन्हातसुद्धा दिसतात. पळापळ, आपण कधी अंतर्मुख होऊन विचार करणार आहोत की नाही? आपल्या घरात, ऑफिसात जो कचरा तयार होतो त्याची आपण कशी विल्हेवाट लावतो? आपले घर आणि आपले ऑफिस अस्वच्छ होणार नाही अशा बेताने घराबाहेर किंवा ऑफिसबाहेर तो टाकून देतो. त्याचे पुढे काय होते याची आपण तमा बाळगत नाही. आश्चर्य वाटेल, पण भाजी-पाल्याची देठे, प्लॅस्टिकच्या पिशव्या, कागदाचे कपटे, केरकचरा, कुजकी-नासकी फळे, लहानसहान डबे, हाडांचे तुकडे वगैरे अनेक प्रकारची घाण स्वच्छता रक्तात हवी । १३३