पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कुटुंबीयांवर हे नवीन संकट कोसळते. कायदा आणि कायद्याचे रक्षक(?) कुटुंबीयांच्या मागे लागतात. त्यांना कायद्याचा धाक दाखवीत हैराण करून सोडतात. कुटुंबीयांचे, मित्रमंडळींचे जगणे असह्य होऊन जाते. असे म्हणतात की, चौयाऐंशी लक्ष योनीतून फिरल्यानंतर आपल्याला परमेश्वर मनुष्यजन्म देतो. परमेश्वराने दिलेल्या या जिवाची हत्या स्वतःच्या हाताने करणे म्हणजे त्या परमेश्वराचा अपमानच नव्हे का? भारतासारख्या देशात क्षयरोग, कुष्ठरोग, कर्करोग, संधिवात आणि अनेक दीर्घकालीन विकारांनी ग्रस्त असलेले लाखो लोक आहेत. भारतातल्या अपंगांची संख्या जवळजवळ ग्रेट ब्रिटनच्या लोकसंख्येइतकी आहे. अंधांची संख्याही प्रचंड आहे. लाखो लोक झोपडीत, फुटपाथवर, बकाल वस्तीत राहतात. शेकडो मुले अशाच ठिकाणी जन्माला येतात. हजारो मुलांचे बालपण प्रचंड कष्ट करून पोट भरण्यात व्यतीत होते. ज्या वयात फुलपाखरांच्या- फुलांच्या सहवासात जगायचे, हसायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात असंख्य मुलांना बूटपॉलिश, लॉटरी तिकीटविक्री... मजुरी, शारीरिक जाचाची कामे करावी लागतात. या दु:खापेक्षाही आपले दुःख मोठे आहे का ? आज लाखो लोकांना रक्ताची गरज आहे. डोळ्यांची गरज आहे. मूत्रपिंडांची गरज आहे. रक्तातील विविध घटकांची गरज आहे. या अवयवांच्या प्रतीक्षेत लाखो रुपये कनवटीला घेऊन अनेकजण आज मृत्यूशी झगडत आहेत. जीवनमरणाच्या ऊन-सावल्यांत त्यांची कठपुतळी बनली आहे. त्यांना अवयवांची किंमत समजली आहे. कवडीमोल कारणावरून हे लाख नव्हे तर कोटी मोलाचे शरीर नाहीसे करणे हा मूर्खपणाच नव्हे का? ज्या पवित्र भूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, सुभाषचंद्र बोस अशा असंख्य शूर वीरांनी देशप्रेमासाठी प्राणत्याग केला त्या महात्मा गांधींच्या देशाची इतकी विकलांग, भ्रष्टाचारग्रस्त, आतंकग्रस्त अवस्था झाली असताना देशासाठी, देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी रक्ताचा एकही थेंब न सांडता केवळ स्वत:च्या एखाद्या १३० । जगण्यात अर्थ आहे..