पान:जगण्यात अर्थ आहे.pdf/११६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वयातच मादक पदार्थाविषयी मनात जिज्ञासा निर्माण होते. या जिज्ञासेपोटी 'एकच प्याला' ओठाला लावला जातो. त्यातून काही सुधाकर आणि तळीराम निर्माण होतात. आजच्या यांत्रिक युगातील प्रचंड स्पर्धेत मिळणारे अपयश हे जसे व्यसनाधीनतेचे कारण आहे तसेच अमाप यश आणि त्याबरोबर मिळणारा अमाप पैसा याही गोष्टी माणसाला व्यसनाधीन बनवितात ही विचारात घेण्यासारखी गोष्ट आहे. तारुण्यात पदार्पण करणारी मुले, आपण मोठे झालो आहोत हे दाखवून देण्यासाठी, तर वय झालेल्या व्यक्ती ‘आम्ही अजून तरुण आहोत' असे भासविण्यासाठी पितात, कधी दारू तर कधी सिगारेट. याशिवाय दु:ख विसरण्यासाठी किंवा एकटेपणा टाळण्यासाठी दारूशी मैत्री करणारे महाभाग आहेत. स्वत:मधील वैगुण्य लपविण्यासाठी दारूचा आधार घेणारे दीड शहाणे आहेत. एवढेच नव्हे तर औषध म्हणून दारूचे पेग घेणारे अतिशहाणेसुद्धा आहेत. दारू पिणाऱ्यांना किंवा अन्य मादक द्रव्ये घेणाऱ्यांना खरेखुरे औषध हे घ्यावेच लागते. कारण अशा व्यक्तींना अनेक प्रकारच्या व्याधी जडतात. या व्याधी जशा शरीराला होतात, तशा मनालाही होतात. हृदयविकार, उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे विविध विकार, विविध अवयवांचे कर्करोग, पचनक्रियेत बिघाड, पचनसंस्थेचे इतर विकार, यकृतातील बिघाड, सिन्हॉसिससारखा यकृताचा भयंकर आजार, डोळ्याचे विकार, रोगप्रतिकारक्षमतेचा -हास, स्नायूंची दुर्बलता, रक्ताचे विकार, मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होणे हे आणि असे अनेक आजार विविध व्यसनांमुळे जडतात. अशा व्यक्तींच्या हातापायांना मुंग्या येतात आणि कंप सुटतात. डोळे जड होतात, संशयी वृत्ती बळावते, स्मरणशक्ती कमी होते, तोल जातात, वारंवार बेशुद्धावस्था येते आणि महत्त्वाचे म्हणजे व्यसनी व्यक्तींची लैंगिक क्षमता हळूहळू कमी होत जाते. व्यसनी माणसाचे दोन महत्त्वाचे दोष असतात. एक म्हणजे अशी व्यक्ती कधीही स्वाभिमानाने जगू शकत नाही आणि दुसरे, तिची विश्वासार्हता खूप कमी असते. अशा व्यक्तीला व्यसनाला वेसण । १९५