पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५०
चीनची संक्षिप्त माहिती.

१६:१८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१८, ६ डिसेंबर २०२३ (IST)१६:१८, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

उपसंहार.

 हा वेळपर्यंत चिनी लोकांसंबंधाने जी विविध प्रकारची माहिती थोड- क्यांत सांगितली त्यावरून स्थूलमानाने त्यांच्या संस्कृतीविषयों व राष्ट्रीय स्वभावाविषयीं वाचकांनां बरीच स्पष्ट कल्पना करतां येण्यासारखी आहे. एक- दरीत हे लोक जर आधुनिक शास्त्र व कला यांचें ज्ञान संपादन करून घेतील तर लवकरच जपानपेक्षांदी बलाढ्य असें राष्ट्रीय सामर्थ्य आशिया खंडांत उत्पन्न करू शकतील, असें मानण्यास कांहीं प्रत्यवाय दिसत नाहीं. नेकी, देशाभिमान, उद्योगशीलता, साधेपणा, काटकपणा, चिकाटी वगैरे राष्ट्रोत्कर्षास अवश्यक असणारे सद्गुण चिनी लोकांत मुळचेच असून त्यांचें तत्वज्ञानही श्रेष्ठ दर्जाचे आहे. याखेरीज धर्म व जात या दृष्टीनेही त्या राष्ट्रांत बरीच एकरूपता आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिले तर तें सर्व जगास भारी आहे. तथापि त्याची स्थिति कांहीं अंशी कुंभकर्णाप्रमाणे आहे. कुंभकर्ण हा कांहीं कमी सामर्थ्यवान् नव्हता. पण बिचारा एकदां झोपी गेला ह्मणजे फिरून लवकर जागा होईल तर शपथ! असली आसुरी झोप घेण्याची संवय चिनी राष्ट्रास लागलेली आहे व हा त्याच्या फाजील सहनशीलतेचा परिणाम आहे. परंतु असें जरी असले तरी त्याची दीर्घकालीक निद्रा ही कांहीं महानिद्रा मात्र खास नव्हे, असें मार्गे दिलेल्या हकीगतीवरून कोणाच्याही सहज लक्षांत येण्यासारखे आहे. चिनी राष्ट्राने आजपर्यंत कैक वेळा अशा लांब झोंपा काढलेल्या आहेत. परंतु त्या झोपांतून जागे झाल्यानंतर तें आपलें तेज प्रगट केल्यावांचून कधीही राहिलेलें नाहीं. दीर्घ कालानें कां होईना, पण जुलूम व अन्याय आणि अव्यवस्था यांचा बीमोड त्या राष्ट्राने आजपर्यंत अनेक वेळ केलेला आहे. आणि पाहिजे त्या परिस्थितीला अनुसरून वागण्याची धमक त्याच्यामध्ये असल्यामुळे यापुढेही जगांत स्वतंत्र राष्ट्र या नात्यानें तें आपले योग्य स्थान कायम ठेवील याबद्दल कोणाही इतिहासज्ञास संशय वाटत नाहीं. मात्र ही स्थिति प्राप्त करून घेण्यास त्यास बराच काल लागेल हे उघड आहे. जपानचे चापल्य व संघटनासामर्थ्य या राष्ट्राचे अंगी नाहीं व तें येणे फारसे