पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६
चीनची संक्षिप्त माहिती.

१५:०३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०३, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:०३, ६ डिसेंबर २०२३ (IST)~

कामा नयेत. अधिकारी लोकांनी एक वर्षपर्यंत लग्नकार्य करितां कामा नये. इतर प्रजेला १०० दिवसांनंतर तें करण्याची मुभा आहे. १००० दिवस - पर्यंत नाटकशाळाही बंद असतात. ह्या कालांत न्हावी, नट वगैरे लोकांनां उपासमार करण्याचा प्रसंग आल्यास त्यांस सरकारांतून अन्न मिळतें. एका आडनावाच्या कुटुंबांत परस्पर लग्नविधी होत नाहींत. परंतु कित्येक जिल्ह्यांत एकाच आडनांवाचे हजारों लोक असल्यामुळे अशा ठिकाणी हा नियम लागू नाहीं. तथापि, तेथें ज्यांच्या पिढ्या तुटल्या आहेत, अशाच घराण्यांशीं शरीर- संबंध करण्याचा नियम आहे. प्रेतदहन व जलसमाधी ह्या दोन्ही गोष्टी कायद्यानें मना केलेल्या आहेत. तथापि एखादा मनुष्य आपल्या घरापासून फार लांब असलेल्या प्रदेशांत मरण पावला तर त्याचे प्रेत दहन करण्याची परवानगी मिळते. कारण दहनाच्या योगानें मृताच्या आत्म्याला तत्काल संचार करितां येतो व त्यामुळे त्यास आपल्या जन्मभूमीस तत्काल जातां येतें अशी चिनी लोकांची समजूत आहे. प्रेतें जाळावयास जरी मनाई आहे तरी बौध्य धर्मोपदेशकांची प्रेते जाळण्यास आडकाठी नाहीं.*

 दिवाणी व फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी पुष्कळ दयार्द्र दृष्टीनें करण्यांत येते. उदाहरणार्थ, ' चोरी ' हा फौजदारी गुन्हा आहे. परंतु उपास- 'मारामुळे माणसाने भक्षणाचे पदार्थ चोरल्यास कोणताही मॅजिस्ट्रेट त्याबद्दल शिक्षा देणार नाहीं. रोटीवाले, धान्यसंग्रह करणारे, शेतकरी यांचे आत्म-


 *बुद्ध धर्मांचा उपदेशक मरण पावला ह्मणजे त्यास एका खुर्चीवर बसवून नंतर ती खुर्ची एका लांकडी पेटींत ठेवितात. मग ठराविक दिवशीं ती पेटी मोठ्या थाटानें स्मशानभूमीकडे दहन करण्याकरितां नेतात. त्या वेळीं मृताचे इतर सहचर पाली भाषेत असलेले मंत्र ह्मणत असतात. स्मशानांत पोंचल्यावर तेथें चिता रचून तींत तेल ओततात व नंतर तोवर प्रेताची पेटी ठेवून तीस अग्नी लावतात. प्रेत दद्दन झाल्यानंतर रक्षा जमा करून ती जपून ठेवतात व पुढे मृताच्या योग्यतेप्रमाणें तिजवर स्मारक बांधण्यांत येतें. बुद्ध भिक्षु वृद्ध झाले ह्मणजे त्यांनां विश्रांति घेण्याकरितां ह्मणून राखून ठेवलेल्या जागेत राहण्याकरितां पाठवितात. तेथे ते समाधी लावून कालक्रमण करीत असतात.