पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२४
चीनची संक्षिप्त माहिती.

१५:००, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:००, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:००, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:००, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:००, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:००, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:००, ६ डिसेंबर २०२३ (IST)१५:००, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

प्राबल्य असलेलें दिसून येतें. चिनी लोकांचा मुख्य विशेष असा आहे की, ते अन्याय कधीही सहन करीत नाहींत. उलटपक्षी स्वतःच्या इच्छेने त्यांनीं जे कायदे आपणावर लादून घेतले असतील ते कितीही कठोर असले तरी त्यांबद्दल ते कधीं कुरकुर करीत नाहींत. ते, ते मोठ्या आनंदाने पाळतात. चीन देशावर आजपर्यंत अनेक राजघराण्यांनी वादशाही सत्ता गाजविली आहे. ह्यांपैकी प्रत्येक घराण्याने निरनिराळे कायदे वेळोवेळी केले आहेत. परंतु त्या सर्वांचे ध्येय मागच्यापेक्षां आपण अधिक सुधारणा `करावी असेंच असलेले दिसून येते. उदाहरणार्थ एक पिनल कोडच घेऊ. ह्या कोडाची रचना २ हजार वर्षांपासून आजपर्यंत कसकशी होत गेली हैं पाहिलें तर आपणांस असें स्पष्ट दिसून येईल कीं, चीनमध्ये आजपर्यंत होऊन गेलेल्या प्रत्येक राजघराण्यानें आपल्या मागच्या राजघराण्याच्या कारकीर्दीतील कोडापेक्षां आपल्या कारकीर्दीतील कोड अधिक सुखावह व सौम्य करण्याचा यत्न केलेला आहे.

 सध्यां जें पिनल कोड तेथे अमलांत आहे तें तर कोणत्यादी सुधारलेल्या राष्ट्रास शोभेलसें आहे; इतकेंच नव्हे तर कांहीं बाबतींत इतरांहून अधिक सरस आहे. उदाहरणार्थ, ज्या अपराध्यांस मृत्युची शिक्षा झाली असेल त्यांनां मरणसमयींचें दुःख कमी व्हावे हाणून स्वतःच्या अगर मित्राच्या खर्चानें अफू अथवा दुसरा कोणताही निशा उत्पन्न करणारा पदार्थ सेवन करण्याची सवलत दिलेली आहे. कधीं कधीं अधिकारी लोकही अशा अप- राध्यांस निशायुक्त पेये देऊन मग वधस्थानाकडे पाठवीत असत, अशी आख्याइका चीन देशांत अद्याप प्रचलित आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत गरमी सक्त असल्यामुळे पिनल कोडांत सांगितलेल्या कित्येक शिक्षा अमलांत आणल्या जात नाहीत. तसेच एखाद्याने गुन्हा कबूल करतांच पश्चात्तापपूर्वक अधिका-याजवळ येऊन आपला अपराध कबूल केला तर कित्येक गुन्ह्यांचे बाबतीत त्यास पूर्ण माफी मिळते. चोरी करणारानेही जर पश्चात्तापपूर्वक चोरलेली वस्तू मालकास तत्काल परत दिली तर त्यासही माफी मिळते. त्याचप्रमाणे गुन्हेगार जरी निरढावलेला असला तरी प्रत्येक वेळेस त्याजवर असलेल्या मुख्य गुन्ह्यापुरतीच शिक्षा त्यास देण्यांत येते. गुन्हेगाराचे लोबती अगर आप्तेष्ट यांस कधींही त्रास दिला जात नाहीं. यामुळे रयतेवर पोलीसचा जुलूम तेथे फारसा होऊं शकत नाहीं, गुन्हे- गाराच्या बाबतीत मात्र कबुलीजबाब काढण्याकरितां हा जुलूम होऊं शकतो;