पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२
चीनची संक्षिप्त माहिती.

१४:५६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५६, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५६, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

आहे. आठ बारा आण्यांपर्यंत किंमतीच्याही नोटा तिकडे चालू आहेत. चीन देशांतील मापें जवांवर ठरविलेली आहेत. दहा जब एकापुढे एक मांडले ह्मणजे एक इंच होतो. असे दहा इंच झाले ह्मणजे एक फूट व असे १० फूट झणजे एक चंग होतो. तोलण्याची वजने इंग्रजी औंस व पौंड यांच्या बरो बरीचीं आहेत. त्यांचे पौंडाचा आकार खोरें अगर टिकाव यांच्या डोक्या- सारखा असतो. वजन व मापें यांचा व्यवहार इकडीलप्रमाणेंच निरनिराळ्या प्रांतांत निरनिराळ्या प्रकारचा आहे. तसेंच शिंपी, सुतार, तेली, दारूविक्या यांच्या परस्पर मापांमध्येही थोडेबहुत अंतर असतें. यामुळे नवीन मनुष्य तेथें गेल्यास प्रथम कांहीं दिवस सर्व मापांची माहिती होईपर्यंत त्याची मोठी गैरसोय होते.

 ख्रिस्ती शकापूर्वी २०० वर्षांपासून चीन देशांत बादशाही राजसत्ता स्थापन झाली. तेव्हांपासून तिच्या स्वरूपांत वेळोवेळीं जरी. थोडेबहुत फेरफार झाले असले तरी एकंदरीत तिचें मूळचे स्थूल स्वरूप परवांच्या क्रांतीपर्यंत अबाधितपणे चालत आलें होतें.

 चीनमधील प्रत्येक इंच जमीन तेथील सरकारची - अर्थात् बादशहाच्या मालकीची आहे. परदेशांतील लोकांनी तेथे अनेक जमिनी आपल्या वहि- वाटीस घेतल्या आहेत. परंतु त्या जमिनीची मालकी त्यांच्याकडे नाहीं. त्या त्यांनी सरकारी पट्ट्याच्या आधारे स्वामित्वाबद्दल ठराविक रक्कम देण्याचें कबूल करून सततच्या कराराने घेतलेल्या आहेत. रयतेचीही गोष्ट अशीच आहे. जमिनीवरील धारा है चिनी सरकारचें मुख्य उत्पन्न आहे. हा धारा जमिनीचे मान पाहून ठरविण्यांत येतो व तो वसूल करण्याचे काम शेतक- न्याला शक्य तितक्या सवलती देण्यांत येतात. सारा वसुलीच्या बाब- तींत तिकडे सहसा कधीं कोणावर जुलूम होत नाहीं. जेव्हां पीक बुडालें असेल तेव्हां शेतकरी देईल तेवढा सारा अधिकारी घेतात व बाकीचा माफ करतात. तसेंच द्रव्याच्या ऐवजी धान्यही कोठें कोठें सान्याबद्दल घेतात. एकंदरीत शेतकऱ्यांना संतुष्ट व सुखी राखण्यांत चिनी सरकार आपली परकाष्टा करीत असतें. जमीनधान्याच्या उत्पन्नाखेरीज दुसरें महत्वाचें उत्पन्न मिठावरील कराचें आहे. त्याचप्रमाणें कस्टमचें उत्पन्नही महत्वाचे आहे. यांखेरीज इतर किरकोळ करांच्या बाबीही लोकमतानुसार ठरलेल्या आहेत.