पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२०
चीनची संक्षिप्त माहिती.

१४:५२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५२, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:५२, ६ डिसेंबर २०२३ (IST)~~

भक्त होता. 'सत्याची महती' वाढविण्यास याचेच ग्रंथ विशेष कारणीभूत झालेले आहेत. मनुष्यस्वभावासंबंधाने याचे मत असे आहे की, मनुष्याचा स्वभाव मुख्यतः तीन प्रकारचा असतो. उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे त्याचे प्रकार आहेत. उत्तम स्वभावाची मनुष्ये निःसंशय सद्गुणीच निपजतात. मध्यम स्वभावाची परिस्थितीनुरूप कधी चांगली तर कधी वाईट अशी निपजतात व कनिष्ट स्वभावाची निःसंशय वाईट निपजतात. मध्यम स्वभावाची माणसे चांगल्या मार्गास लागली तर उत्तम स्वभावाच्या माणसाच्या तोडीची बनतात. उलटपक्षी, वाईट मार्गात सांपडली तर अधम स्वभावाच्या माणसाच्या तोडीची निपजतात.

 'दृश्य सृष्टी' संबंधानेही चिनी तत्ववेत्त्यांनी मोठमोठ्या गहन व गूढ तत्वांचे उद्घाटन केलेले आहे. चौंगडझ या नांवाच्या तत्ववेत्त्याने ह्यासंबंधाने बऱ्याच विस्ताराने लिहिलेले आहे. 'जन्म' व 'मृत्यु' ह्यासंबंधानेही ह्या तत्ववेत्त्याने सूक्ष्म विवरण केलेले आहे. ह्या तत्ववेत्त्याचे अनुयायी व शिष्य पुष्कळ होते. ह्याचे वर्तन फार सात्विक होते. 'उच्च विचार व साधी राहणी' ह्या तत्वानुसार त्याचा जीवनक्रम चालला होता. ह्यामुळे तो फार लोकप्रिय झाला होता. ह्याचा प्रतिस्पर्धी होयेड नामक होता. ह्याची विचारसरणी काहीशी विचित्र होती. तथापि तो चांगला कल्पक होता असे खुद्द चौगडझू यानेही कबूल केलेले आहे. त्याचे ग्रंथ लांकडाच्या चिपांवर लिहिलेले असून त्यांची संख्या पांच गाडे भरतील इतकी मोठी आहे. त्याच्या विचारसरणीचे काही मासले पुढे दिले आहेत.

 (१) नुकत्याच घातलेल्या अंड्यांत पंखें असतात; कारण ( त्यामळेंच) ती पुढे उपजणाऱ्या पिलांस येतात.
 (२) अग्नि हा काही स्वभावतः उष्ण नाही; तर मनुष्याला तो उष्ण वाटतो-लागतो.
 (३) डोळा कोणतीही वस्तू पहात नाही; मनुष्य पहातो.
 (४) कंपासामुळे वर्तुळ तयार होत नाही; मनुष्य तें तयार करितो.
 (५) जे पोरके असेल त्याला केव्हांच आई नव्हती असें ह्मटले पाहिजे. कारण ज्याला एकदां आईचा संस्कार झाला असेल त्याला पोरके ह्मणता येणार नाही.

 याप्रमाणे चिनी तत्ववेत्ते व त्यांचे तत्वज्ञान यांची हालहवाल आहे.

______________