पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४
चीनची संक्षिप्त माहिती.

१४:३१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:३१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:३१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:३१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:३१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:३१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:३१, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:३१, ६ डिसेंबर २०२३ (IST)

 ही परिक्षा प्रत्येक प्रांतांत दर तीन वर्षांनी एकदां होते. त्या वेळीं पेकींग येथून बादशाही हुकमावरून एक बडा अधिकारी-परिक्षक तेथें पाठ- विण्यांत येतो. तो परिक्षेच्या स्थानी येऊन पोचल्यावर त्याला एका बंगल्यांत कोंडून ठेवण्यांत येते व त्याची कोणाशीही खासगी मुलाखत होऊं देत नाहींत. ह्या परिक्षेस वयाची मर्यादा नाहीं. यामुळे तरुण व प्रौढ वयातीत - अशा दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी ह्या परिक्षेस बसण्याकरितां येत असतात. ७२ वर्षांच्या वयाचा मनुष्य एकदां ह्या परिक्षेस बसून पास झाल्याचा दाखला आहे!

 परिक्षा घेण्याची वेळ होतांच परिक्षेकरितां बांधलेल्या वाड्याचे दरवाजे उघडण्यांत येऊन विद्यार्थ्यांस एकामागून एक असें आंत सोडण्यांत येते. दर- वाजावर त्यांची अत्यंत कडक रीतीनें झडती घेण्यांत येते * आंत गेल्यावर त्यांचीं नांवें पुकारणाऱ्या अधिकाऱ्याकडून प्रत्येक विद्यार्थ्यास त्याच्या उघड्या घरकुल्याच्या नंबरचें ( open cell No. ) तिकिट त्यास देण्यांत येतें. लिहिण्याचें सामान व खाण्याची शिदोरी ही विद्यार्थी बरोबर घेऊन येतात. सर्व विद्यार्थी आपापल्या जागेवर बसल्यावर वडा परिक्षक अधिकारी सुगंधी द्रव्यें जाळतो व वाड्याचे दरवाजे आंतून बंद करितो. परिक्षेची बैठक तीन दिवसपर्यंत चालू असते व अशा एकंदर तीन बैठकी होतात. विद्यार्थी व परिक्षक ह्या सर्वांस प्रत्येक बैठकीच्या वेळीं ३ दिवस सारखेच कोंडून ठेवण्यांत येते. आंतून बाहेर कोणी जावयाचें नाहीं व बाहेरून आंत कोणी यावयाचें नाहीं; व विद्यार्थ्यांनी आपले स्थान सोडावयाचें नाहीं, असा कडक निर्बंध पाळण्यांत येतो. तिसरे दिवशीं रात्री विश्रांतिकरितां विद्यार्थ्यांस बाहेर सोडतात. तों- पर्यंत कोणी मेला व इतक्या गर्दीत एखादे वेळेस असा प्रकार घडून येणें अशक्य नाहीं तरी देखील तेथील शांततेचा भंग होऊ देत नाहीत ! अशा वेळीं मृताचें शव भिंतीस टांगून ठेवण्यांत येते व हा नियम खुद्द बख्या परि- क्षक अधिका-यासही लागू आहे. त्याच्यावर असा प्रसंग आल्यास त्याचें काम त्याचा दुय्यम करितो हा दुय्यम अधिकारीही बादशाही हुकुमानेंच पेकींग येथून आलेला असतो.


 *ह्या झडतीत क्वचित् विद्यार्थ्याजवळ बारिक पुस्तकें, टिप्पर्णे वगैरे सांपडतात व त्याबद्दल विद्यार्थ्यांस शासनही होत असतें.