पान:चीनदेशाची संक्षिप्त माहिती.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
लेखांक १ ला.

१४:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)१४:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)चंद्रकांत जाधव (चर्चा) १४:१९, ६ डिसेंबर २०२३ (IST)

होत नाहीं. परंतु संकटपरंपरा प्राप्त झाली ह्मणजे मात्र त्याला देवतांची आठ वण होते व त्यांची कृपा संपादन करण्याकरितां तो निरनिराळे नवस - तोडगे- मंत्रतंत्र वगैरे प्रकार करूं लागतो. देवरूसपणा, जादुटोणा, जारणमारण वगैरे प्रकारांनी चिनी लोक आपली आपत्ती दूर करण्याची खटपट करितात. बुद्ध महंत हे धर्मगुरू समजले जातात. व त्यांच्या द्वारें लोक आपल्या अनिष्ठाची शांति करितात. महंताची दिक्षा देण्याचा प्रकार कांहीसा विचित्र आहे. हा समारंभ हृदयद्रावक असतो. महंत होऊं इच्छिणाऱ्या उमेदवाराच्या टाळूस टक्कल पडण्याजोगे ३ पासून ९ पर्यंत डाग दिले जातात व त्यांच्या वेदना निमुटपणे सहन करण्याबद्दल त्या उमेदवारास महंत बनलेले लोक उपदेश करीत असतात ! अशा रीतीनें यथाशास्त्र संस्कार पूर्ण झालेल्या उमेदवारास महंत पदवी प्राप्त होते व उपाध्येपणाचा दाखला मिळतो. त्याच्या आधारा- वर त्याला साम्राज्याच्या कोणत्याही भागांत एक रात्र वस्तीस जागा व भोजन हक्काने मिळवितां येतें. कन्फ्युशियस व टौ ह्या दोन थोर पुरुषांनी स्थापन केलेल्या धार्मिक पंथांचाही चीन देशांत बराच प्रसार झालेला आहे. परंतु ह्या लोकांची शिकवण ' धर्मापेक्षां नीतीच्या सदराखाली जास्त मोड - ण्याजोगी आहे. भूताखेतांचे बंड चीन देशांत फार आहे. त्यांत शुभ व अशुभ असे दोन प्रकार आहेत. चांगल्यांस प्रसन्न करण्याकरितां व वाईटांच्या पीडेची बाधा निवारण करण्याकरितां नानाप्रकारचे मांत्रिक व तांत्रिक छा - छूचे प्रकार तिकडे नित्य चालू असतात. भूतें व देवता अंगांत आणणें व त्यांच्या तोंडून इष्टानिष्ट गोष्टी व भविष्य वदविणें वगैरे खुळचटपणाचे प्रकारही तिकडे सडकून आहेत. ते इतके की, त्यांस आळा घालण्याकरितां तेथील सरकारास कायदे करणें भाग पडलेले आहे.

 नीति व सदाचार या बाबतींत सुमारे २५०० वर्षेपर्यंत चिनी लोक कनफ्युशियस ह्यास आपला मार्गदर्शक मानीत आले आहेत. ह्या नीति- शास्त्रज्ञाचा उपदेश चिनी लोकांच्या अगदीं हाडीमासीं खिळलेला असल्यामुळे इतर सर्व नीतिशास्त्रज्ञांपेक्षां सर्व चीनभर ह्याचेच वर्चस्व आहे. आमच्याकडे ज्याप्रमाणें नारद, विदूर, बृहस्पति, शुक्र वगैरे नीतिशास्त्रज्ञ होऊन गेले, त्याच मासल्याचा कनफ्युशियस होता. व त्याचे नीतिविषयक ग्रंथही उपरोक्त आर्य ग्रंथकारांच्या ग्रंथांसारखेच जवळ जवळ आहेत. कंगाल झोंपडींतील शेतकन्यापासून तों खुद्द परमेश्वराचा पुत्र ह्मणून मानलेल्या बादशहापर्यंत