पान:चिंचवड येथील प्रसिध्द साधु श्रीमन्मोरयागोसावी महाराज यांचे गद्य चरित्र.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंगलाचरण. स्रग्धराः सर्वेशा, सर्ववंद्या, भवनिधिहरणा, वक्रतुंडा गणेशा || विघ्नेशा, विश्वभर्त्या, कलिमलदहना, ज्ञानज्योति प्रकाशा || सद्भावें वंदितों मी तवपदयुगुलां संहरी या त्रितापा || सप्रेमें शक्ति द्यावी तव चरितकथा बा रचायास बापा ॥१॥ इंद्रवज्रा. सप्रेम मी वंदित शारदा ती ॥ आहे जगीं जी बहु बुद्धिदाती || वाग्देवते बैससि मन्मुखांत || येईल हा ग्रंथ तरी जगांत ॥ २ ॥ द्रुतवि० विनवितों सकलां अमरांप्रती ॥ सुवर देउनि तोषवि संप्रती ॥ निरसुनि मम विघ्नगणा त्वरें || चरित सिद्धिस न्या अपुल्या करें ॥३॥