पान:चार चरित्रात्मक लेख.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कै. सौभाग्यवती डाक्टर आनंदीबाई जोशी. SOLX काटें काया झिजवावी । उत्कट कीर्ति उरवावी। चटक लावून सोडावी। कांहीं एक ॥-रामदास. श्रीसमर्थांनी जेव्हां हा उपदेश लिहिला तेव्हां त्यांचा उद्देश हा उपदेश वाराणीय जनांनी आदरावा असा असावा. कारण दासबोध ग्रंथ लिहिण्याचा मळ हेतु प्रत्यक्षत: शिवाजी व तत्कालीन त्यांचे इतर शिष्य यांस राजकीय व पारमार्थिक उन्नति शिकवावी व परोक्षत: इतर सर्व महाराष्ट्रीयांसही सद्बोध करावा असा होता, ही गोष्ट सर्वसंमत आहे. आपल्या उपदेशाप्रमाणे वागणारे कांही लोक निघतील व यथाशक्ति आपल्या देशाचे पांग फेडतील, व स्वत: कृतार्थ होऊन दुसऱ्यासही कृतार्थ करतील, असें समर्थास वाटले असावें, व त्याप्रमाणे आज दोनशे वर्षांत समर्थांचे शिष्य ह्मणवून घेण्यास योग्य असे काही यरुष निपजले, व पुढेही निपजतील. नुसता भगवा पटका बांधला व हातांत कुबडी .