पान:गोमंतक परिचय.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. वळवईचे लष्करी बंडा-गोमंतकांत त्या काळी सुमारे चार पांच हजार शिपाई होते. इ. स. १८७० सालीं ह्या लष्करांतील शिपायांचा पगार कमी केला गेला; बरेचसे लष्कर काढूनही टाकण्याचे ठरलें व उलटपक्षी केवळ ऑफिसरांचा पगार मात्र वाढविण्यात आला. सामान्यतः लष्करी हुद्दे लूझो इंडियन लोकांच्याच हाती होते. ऑफिसरच्या हुद्यांवर ज्या इसमाची बढती व्हावयाची होती, त्यांची निराशा होण्यास लष्करच्या छाटाछाटीचा हुकूम कारणीभूत झाला. तेव्हां त्यांनी शिपायांना चिथावणी देऊन उठावणी केली. व शिपायांनीहि आपापली शस्त्रे काडतुसे व निशाणे घेऊन शांतपणे वळवई येथे तळ दिला. गव्हर्नरच्या हुद्यावर त्या वेळी दुसऱ्यानदां गोव्यांत आलेले पेस्तान नांवाचे सत्तर वर्षांचे वृद्ध गृहस्थ होते. त्यांनी समय ओळखून बंडवाल्याच्या पगाराविषयीं तोड काढली व कमी करण्यांत येणाऱ्या शिपायांना आफ्रिकेंत नोकरीस पाठविण्यात येणार नाही इत्यादि अभिवचनें देऊन बंड शमविलें. हे त्यांचे धोरण पोर्तुगाल सरकारला नापसंत पडल्यामुळे बिचाऱ्या वृद्धाला मात्र पदच्युत व्हावे लागले. माशेलांतील बंड व लष्कराची छाटाछाटः–वळवईचे बंड थांबलें खरें परंतु त्याची मुख्य दोन कारणें, ऑफीसरांची बढती व लष्करी शिपायांची संख्या कमी करणे ती कायमच होती. पेस्तानच्या मागून आलेले नवे गव्हर्नर व्हिस्कोंद द सां जानुवायु यांनी पब्लिकवर्क्स खात्यांत कांहीं जागा निर्माण करून त्यांवर ह्या प्रमोशनवाल्या उमेदवारांपैकी बऱ्याच जणांची सोय लाव'ग्याचा उपक्रम केला. परंतु त्या वर्गातील असंतोष मुळीच कमी झाला नाही. बंडाची चिन्हें स्पष्ट दिसू लागतांच गव्हर्नरने उपरोक्त असंतुष्ट उमेदवार व इतर प्रमुख व्यक्ती मिळून आठ इसमांना कैद करून आग्वाद किल्ल्यावर ठेविलें. ता. २२ सप्टेंबर १८७१ रोजी डिचोलीचे तिसरें बटालियन आपल्या कमांडरला अटकेत ठेवून बंडाचे निशाण उभारून माशेलांत छावणीस राहिले. गव्हर्नरने म्हापशेच्या ४ थ्या बटालियनास पणजी शहर रक्षणाची कामगिरी सांगितली. त्याप्रमाणे त्याने म्हापशें सोडून पणजीमार्गे कूच केले. परवरी गांवांत पोंचतांच शिपाई व सार्जंट यांनी कमांडरचा हुकूम मानण्याचें नाकारले. तेव्हां कमांडरने त्यांना म्हापशे येथे परत नेऊन रजा दिली. ता. २३ रोजी तोफखान्याची तुकडी व म्युनिसीपल गार्डच्या हातीं शहररक्षणाचे काम दिले गेलें. ता. २४ रोजी फोंडेंचे बटालियन बंडांत सामील झाले. त्यांपैकी काही शिपायी मडगांव येथे जाऊन तेथील पहिल्या बटालियनास बरोबर घेऊन, जुन्या गोव्यांत