पान:गोगलगाईचे पंख.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आजीच्या वेळी काय दिवस आलेत सगळीकडे रांगा न् पाळी आमच्या वेळी अस्सं नव्हतंच मुळी दह्यादुधाच्या भरलेल्या चरव्या आता मिळतात दुकानात लिटरच्या पिशव्या लोण्याचा गोळा ज्वारी-बाजरीच्या भाकरीवर आता लावतात बटर पावा- ब्रेडवर भरलेल्या घरात गजबज पाहुण्या रावळ्यांची आता सरबराई चालते कुत्र्या मांजराची ऊबदार मऊ चौघडीवर खरखरीत घोंगडी बिनवजनाच्या रजईची भलीमोठी घडी 65