पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

X。 गीतारहस्य अथवा कर्मयेोग कारण काय, किंवा तें आलें कोठून, याची आधिभौतिकवादानें कांहींच उपपत्ति लागत नाही. कारण, बाह्य सृष्टीतील सुखदुःखांच्या अवलोकनानें कोणताही सामान्य सिद्धान्त केला तरी सर्व सुखदुःखे स्वभावतःच अनित्य असल्यामुळे त्यांच्या ढिसूळ पायावर रचिलेले नीतिसिद्धान्तहि तितकेच कचे म्ह० अनित्य बनतात; व त्यामुळे सुखदुःखांचा विचार न करितां, सत्याप्रीत्यर्थ प्राण गेला तरी बेहतर अशी जी सत्यधर्माची त्रिकालाबाधित नित्यता ती “पुष्कळांचे पुष्कळ सुख” या तत्त्वानें सिद्ध होत नाहीं. सामान्य व्यवहारांत सत्यासाठी प्राणदेण्याची वेळ आल्यास मोठमोठे लोकहि असत्याचा आश्रय करितात, व शास्रकारहि अशा वेळी फार ओढून धरीत नाहीत असें जर आपण पहातों, तर सत्यादि धर्म नित्य मानण्याचे कारण नाहीं, अशी यावर कित्येकांची कोटी आहे. पण हा युक्तिवाद बरोबर नाहीं. कारण, सत्याकरितां प्राण देण्याचें ज्यांना धैर्य होत नाहीं केिवा सोयीस्कर पडत नाहीं असे पुरुप देखील या नीतिधर्माचे नित्यत्व स्वमुखानें कबूल करीत असतात. या साठा महाभारतात अर्थकामादि पुरुषार्थ सिद्ध करून देणाच्या सर्व व्यावहारिक धर्माचे विवेचन केल्यावर अखेरीस भारतसावित्रींत (आणि विदुरनीतीतहि) व्यासांनीं न जातु कामान्न भयान्न लोभाद्धर्म त्यजेजीवितस्यापि हेतोः । धर्मो नित्यः सुखदुःखे त्वनित्ये जीवो नित्योः हेतुरस्य त्वनित्यः। “सुखदुःखें अनित्य, पण (नीति) धर्म नित्य आहेत; म्हणून सुखेच्छेनें, भयानें, लोभामुळे किवा प्राण जावयाचा असला तरी देखील धर्म कधीहि सोडू नये. जीव मूळांत नित्य असून त्याचा हेतु म्हणजे सुखदुःखादिविषय आनत्य होत ”म्हणून अनित्य सुखदुःखांचा विचार करीत न बसतां, नित्य जीवाची धर्माशींच नेहमीं जेोड घालून दिली पाहिजे, असा सर्वस उपदेश केला आहे (मभा. स्व. ५. ६; उ. ३९. १२, १३). व्यासांचा हा उपदेश कितपत येोग्य आहे हें पहाण्यास सुखदुःखमें खरें स्वरूप काय, व नित्य सुख कशाला म्हणतात, याचा