पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/102

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

\o 6 गीतारहस्य अथवा कर्मयोग प्रेरणा; अर्थात् कोणी तरी अधिकारी पुरुषानें “तूं अमूक कर” अगर “करूं नकोस'। असे सांगणें किवा आज्ञा करणे. जॉपर्यंत अशा त-हेचा निर्बध कोणी घालून देत नाहीं किंवा प्राप्त होत नाहीं, तोपर्यंत कोणतीहि गोष्ट कोणालाहि करण्याची मुभा आह. धर्म हा प्रथमतः निर्बधामुळे निर्माण झाला असा यांतील अभिप्राय आहः आणि प्रसिद्ध इंग्रज ग्रंथकारहँॉब्स् याच्या मतांशी ही धर्माची व्याख्या कांहीं अंशों जुळती आहे. रोनटी अवस्थेत प्रत्येक मनुष्य ज्या काली जी मनोवृतिप्रबलअसेल त्याप्रमाणें वर्तन करीत असतो. पण पुढे हळूहळू अशा प्रकारचे स्वैर वर्तन एकंदरीत श्रेयस्कर नाही असें आढळून आल्यावर इंद्रियांच्यायदृच्छाप्रयुक्तव्यापारांस मर्यादा ठरवून ती पाळणें यांतच सर्वांचे कल्याण आहे अशी खात्री होत जात्ये व शिष्टाचारानें किंवा अन्य रीतीनें दृढ झालेल्या असल्या मर्यादा प्रत्येक मनुष्य कायद्यासारखा पाळू लागतो; आणि अशा प्रकारच्या मर्यादा बयाच झाल्यावर त्यांचे शास्र बनतें. विवाहव्यवस्था पूर्वी प्रचारांत नसून ती प्रथमतः श्वेतकेतूनें अमलांत आणिली, आणि सुरापानशुक्राचार्यानीं निषिद्ध ठरावलें हें मागच्या प्रकरणांत सांगितले आहे. या मर्यादा घालून देण्यांत श्वेतकेतु किंवा शुकाचायै यांचा काय हेतु होताहें न पाहतां अशा तन्हेच्या मर्यादा घालून देण्याचे त्यांचेकडे आललें कर्तृत्वच केवळ लक्षांतघेऊन “चोदनालक्षणोऽर्थो धर्मः” ही धर्म शब्दाची व्याख्या निष्पन्न झाली आह. धर्म झाला तरी प्रथमतः त्याचे महत्त्व कोणाच्या तरी लक्षांत येऊन मग त्याची प्रवृात होत असत्ये. खा, पी, चैन कर हें कांहीं कोणास सांगावयास नको; कारण, हे इंद्रियांचे स्वाभाविक धर्मच आहेत.‘‘न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने”(मनु. ५.५६)-मांस भक्षण करण्यांत, तसेंच मद्य आणि मैथुन यांतहि कांहीं दोष म्हणजे सृष्टिकर्माचे विरुद्ध गोष्ट आहे असें नाहीं,-असें जें मनूनें म्हटलें आहे त्यांतील तात्पर्यहि हेंच आहे. या सर्व गोष्टी मनुष्यासच नव्हे, तर हरएक प्राण्यास रागतःच प्राप्त आहेत-“प्रवृत्तिरेषा भूतानाम्” समाजधारणेसाठी म्हणजे सर्व लोकांच्या सुखासाठीं या रांगतः प्राप्त झालेल्या स्वैराचरणास आळा घालणे हाच धर्म होयू.कारण- न्यमे भेर्नर आहारनिद्राभय च सामान्यमतत्पशुाभनराणाम । धर्मे हि तेषामधिको विशेषेो धर्मेण द्दीशोः पशुभिः समानाः॥ “आहार, निद्रा, भय आणि मैथुनहीं मनुष्यांस आणि पशंस सारखींच रागतः प्राप्त आहत. धर्म (म्हणजे यांस नीतीच्या मयौदा घालणे) हाच काय ते मनुष्य आणि पशु यांच्यामध्यें भद होय; आणि ज्यांना हा धर्म नाहीं ते पशुच समजावयाचे !' महाभारतांत शांतिपर्वात अशाच अर्थाचा एक लोक असून (शां. २९४. २९ पहा) आहारादिकांना आळा घालण्यास सांगणारा भागघतांतील मागील प्रकरणांत