पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग २-गाता व उपनिषदें ५९-३ उपनिषदें पुष्कळ असून त्यांपैकीं कांहींची भाषा इतकी अर्वाचीन आहे कीं, हीं उपनिषदें व जुनीं उपनिषदें एकाच कालचीं नाहीत असें सहज दिसून येतं. म्हणून गीतंतील व उपनिषदांतील प्रतिपाद्य विषयांचे सादृश्य पहातांना ब्रह्मसूत्रांत ज्या उपनिषदांचा उल्लेख आहे तींच उपनिषदं मुख्यत्वेंकरून आम्ही या प्रकरणांत तुलनेसाठी घेतली आहत. या उपनिषदांतील अर्थाचा व गीतंतील अध्यात्माचा मळ पाहूं लागलें तर प्रथम असें आढळून येतें की, निर्गुण परब्रह्माचे स्वरूप दोहींमध्ये जरी एकच आहे,तरी निर्गुणापासून सगुण कसें निर्माण झाले याचे वर्णन करितांना ‘अविद्या’ शब्दाऐवजी 'माया' किंवा ‘अज्ञान' हे शब्दच गीतेमध्यें योजिले आहेत. ‘माया' हा शब्द श्वेताश्वतरोपनिषदांत आला असून नामरूपात्मक अविद्येसच हा दुसरा पर्याय शब्द आहे, हा खुलासा पूर्वी नवव्या प्रकरणांत केलेला आहे; आणि श्वेताश्वतरोपनिषदांतलि कांहीं श्रुझेोक अक्षरश: गीतंत आले आहेत हें वर दाखविले आह. यावरून पहिले अनुमान असें होतें कीं, “सर्व खल्विदं ब्रह्म” (छां.३. १४.१)किंवा “सर्वमात्मानं पश्यति”(बृ.४,४.२३) अथवा “सर्वभूतेषु चात्मानं०” (ईश.६) हा सिद्धान्त किवा उपनिषदांतील एकंदर अध्यात्मज्ञान यांचा जरी गीतेत संग्रह केला आहे, तरी नामरूपात्मक अविद्येस माया हें नांव उपनिषदांतच रूढ झाल्यावर मग गीताग्रंथ झालेला आहे. आतां उपनिष २ांतील आणि गीतेंतील उपपादनांत भद कोणता याचा विचार केला, तर गीतेत कापिल सांख्यशास्राला विशेष महत्त्व दिल्याचे दिसून येईल. बृहदारण्यक किवा छांदोग्य या ज्ञानपर उपनिषदांमध्यें सांख्यप्रक्रियेचे नांवहेि आढळून येत नाही; आणि कटादि उपनिषदांत जरी अव्यक्त, महान इत्यादि सांख्यांचे शब्द आले तरी त्यांचा अर्थ सांख्यप्रक्रियेप्रमाणें न समजतां वेदान्ताच्या सरणीस धरून लाविला पाहिजे असें उघड दिसत असून मैत्र्युपनिषदांतील उपपादनासहि तोच न्याय लागूं पडतो. सांख्यप्रक्रियेस याप्रमाणे बहिष्कृत करण्याची मजल येथपर्यंत येऊन पोचली आहे की, वेदान्तसूत्रांत पंचौकरणाचे ऐवजीं छांदोग्योपनिषदाला धरून त्रिवृत्करणानेंच सृष्टीतील नामरूपात्मक वैचित्र्याची उपपात सांगितली आहे (वे.सू.२.४.२०).सांख्यांना अजीोबात सोडून देवून अध्यात्मांतील क्षराक्षराचे विवेचन करण्याची ही पद्धत गीतंत स्वीकारिली नाहीं. तथापि सांख्यांचे सिद्धान्त जसेच्या तसेहि गीतेंत घेतलेले नाहींत हें लक्षांत ठेविलें पाहिजे. त्रिगुणात्मक अव्यक्त प्रकृतीपासून गुणेोत्कर्षानें सर्व व्यक्त सृष्टि कशी निर्माण झाली याबद्दलचे सांख्यांचे सिद्धान्त, आणि पुरुष निर्गुण असून तो द्रष्टा आहे हें त्यांचे मतहि गीतेस प्राह्य आहे. पण प्रकृति व पुरुष हीं स्वतंत्र न मानितां दोन्हीहि उपनिषदांतील आत्मरूपी एकाच परब्रह्माची रूपें म्हणजे विभूति