Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सगुणांचा येशू खिस्तावर पूर्ण भरवसf• Y3 तेवा सर्व शक्तीने करावी आणि आपणाला त्याला सोपून द्यावें, असी इच्छा उत्पन्न होती.” ‘जर यानें मला राखलें नसतें, तर हजारों वेळ अडखळून मी निराश झालें असतें. ह्याशिवाय मला दुसरा कोणी नार्डी. तो माझा एकच आश्रय आहे.” 'जसी जसी ह्याजवर चिंता टाकितां येती, तसी तसी त्याच्या इच्छेप्रमाणें करायास शक्ति मिळती. मरणापर्यंत त्याजवर भरवसा ठेवावा, झणून त्याची कृपा असावी. मला मरणाचें भय काडीमात्र वाटत नाहीं, कारण कीं त्याने त्याची नांगी नाहींसी केली, हें मला ठाऊक आहे. पुढे केवढे सुख होईल ! महाराज, हें माझें मत योग्य आहे कीं नाहीं हैं मला सांगा. म्यां न फसावें. येशू खोताच्या पुण्याशिवाय मला दुसरी कोण तोहि आशा नाहीं. अंत:करणाला विचारिलें असतां मला भय वाटते. कारण कीं तें खोटे व ढोंगी आहे. त्याने मला वारंवार फसविले आहे, परंतु खीस्ताला विचारलें असतां, तो