Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

A o गवळ्याच्या कन्येच गोष्ट. स०- ‘अगे आई, असे नको ह्मष्यूं. यापेक्षां असे ह्मण कों, खीस्ताने आमच्या कन्येला घरीं आणलें, यासाठीं कीं, त्याने तिच्या आत्म्याला काय केलें, हें तिने आह्मास सांगावें, आणि याने आमच्याहि आत्म्यास तारावें.' याच वेळेस गवळी दूध घेऊन आंत आला. त्याने क्षणभर दारासीं उभे राहून बायकोचे व कन्येचें हें शेवटील वाक्य ऐक्रिोलें होतें. तेव्हां तो सुसकारा टाकोत झणाला. ग:०- “इला आशीर्वाद असो, आमच्या शरीराचें व आत्म्याचें साह्य करावें, ह्मणून चांगली चाकरी सोडून ही घरीं आली, ही गोष्ट खरी आहे. महाराज, ही फार रोगी दिसती कीं नाहीं ? महाराज, ही फार वेळ एथें राहणार नाहीं असें मला वाटते.” सं०- “हें प्रभूकडे सोपून द्या. आमचें सर्व त्याच्या हातांत आहे, आणि असें असावें, हें बरें आहे. मी जायास खुशी आहे. बाबा, ज्याने