गवळ्याच्या कन्येची गोष्ट. 2 ‘या लोकानी बहुतकरून असा उपदेश अगोदर कधीं ऐकला नव्हता. ह्मणून ते कुरकूर करून उपदेशकाचा द्वेष करूं लागले, तरी त्यामध्यें मजसारिखे, ज्यांच्या मनांत उपदेश ठसला असे कित्येक होते. आणि त्यानी आणखी ऐकायास इच्छिलें, परंतु तो उपदेशक पुन्हा कधीं आला नाहीं. 'मला कोणी धर्म सांगणारा नव्हता, परंतु म्यां थोडीं पुस्तकें मिळविलीं आणि एकांतीं बसून तीं वाचत आणि प्रार्थना करीत असें, त्यावरून मी फार पापी व दंडपात्र आहे आणि मला तारायाला खीस्ताने दु:ख सोसिलें यांत अत्यंत दया आहे, असें मनांत आलें. अही महाराज, मला क्रती मोलवान तारणारा सांपडला आहे! म्यां मागावे किंवा इच्छावे त्यापेक्षां तो अधिक आहे. तो माझ्या सर्व गरजा पुरवितो. त्याच्या उरास टंकल्यानें मला सर्व पापें आणि दु:खे यांजपासून विसावा मिळतो, आणि त्याचें वचन सर्व संशय व अविश्वास दूर करायास शक्ति देते."
पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/39
Appearance