Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सगुणी उपदेशकास चिटी पाठवितो. संभाषणाची आठवण होती तेव्हां मी आपल्या मनांत देवाचे उपकार मानितों. एका दिवसी तिने मला एक चिटी पाठविली, ती असी कों, 'महाराज, मज पापिणीला भेटायास येण्याची जर आपण्याला फुरसद होईल, तर मला फार आनंद वाटेल. माझें आयुष्य बहुतकरून भरत आल आह. परंतु खास्त माझ्या आत्म्याला अमूल्य आहे. आपलें संभाषण वारंवार माझ्या उपयोगी पडलें आहे आणि आतां त्याची विशेष गरज आहे. माझ्या आईबापांनी आपणास सलाम सांगितला आहे. तुमची अयोग्य व आज्ञांकित चाकरीण सगुणी इचा सलाम.” याच दिवसीं संध्याकाळीं मी गेले, आणि गवळ्याच्या घरीं पोहंचलों असतां त्याच्या बायकोने दार उघडलें. तने आपलें डोके हालदून आसवें गाळिली. तिचे अंत:करण दुःखाने भरलें होते. तिने मजसीं बोलायास प्रयत्न केला, परंतु गहिंवरामुळे तिच्याने बोलवेना. मी तिचा