Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवळ्याच्या कन्येची गोष्ट. फार इच्छा आहे. परंतु या माझ्या आईबापांनीहि । धमॉवरून समाधान पावावें असें मी इच्छिते." उप० - 'सायंकाळीं प्रकाश होईल, हें वचन याविषयीं पूर्ण झालें, असें उघड दिसतें.” स०- ‘होय, पूर्ण झालें, असी माँ विश्वासतें, आणि हा भरवसा धरून मी ईश्वराची स्तुति करितें.” उप०- “तुझ्या प्रयत्नांकडून ते ख-या धर्मात आले यावरूनहि त्वां देवाचे उपकार मानावे. सं०- 'मानितें महाराज, पण जेव्हां मी आपली अयोग्यता मनांत आणितें, तेव्हां भयाने आनंद करिते.” तेव्हां ती भला ह्मातारा गवळी ह्मणाला, ‘महाराज, ईश्वर आपणाला या कृपेचें प्रतिदान देईल असो माझी खातरी आहे. आह्मी फार पापी आहॉ, तरी ईश्वराने ह्यातारपणीं आह्मावर दया करावी ह्मणून आपण त्याची प्रार्थना करावी. ही गरीब सगुणी शरीराने व आत्म्याने आह्माविषयीं फार प्रयत्न करितो.