Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

6 गवळ्याच्या कन्येची गोष्ट गाईस गोठ्याकडे वळवीत आहे असा माझ्या दृ- | ठोस पडला. मी त्याजवळ गेलों तरी त्याने मला पाहिलें नाहीं, कारण कीं याची दृष्टि मेंद झाली होती. मग म्यां त्याला हाक मारली, तेव्हां तो माझा शब्द ऐकतांच डचकला. तथापि आनंदयुत चेह-याने माझें आगतस्वागत करून ह्मणाला, महाराज, फारफार सलाम. आपण आलां यावरून आह्माला फार संतोष आहे. या आठवड्यांत रोज रोज आह्मी तुमची वाट पाहत आहॉ. नंतर झोपडीचें दार उघडून त्याची कन्या व तिची ह्यातरी आई बाहेर आल्या. त्यानी मला पाहतांच, ज्या कबरेजवळ त्या मला पहिल्याने भेटल्या होत्या, ती त्यांच्या मनांत आली. त्यानी आनंदाने व प्रेमाश्रुने माझें आगतस्वागत केलें; आणि लहान सुंदर बागांतून मला घरांत नेले. ते घर आंतून बाहेरून स्वच्छ व ठाकठिकीचें आहे, असें दिसून आलें. ही झोंपडी धार्मिकपण, शांति, आणि समाधान राहण्याजोगी