Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3. गवळ्याच्या कन्येच गोष्ट. आतां ईश्वरापासीं राजे आणि उपाध्ये होऊन अक्षय सुख भोगीत आहेत, असा भरवसा धरून आही फार हर्ष पावतो. मरून गेलेले मित्र ज्यांसीं देवाच्या राज्यांतील गौरव व कृपा यांविषयीं संभाषण करायास मला सुख वाटले, त्यांतील एक ही गवळ्याची कन्या आहे. तिची गोष्ट सर्व वाचणा-यांस बोधकारक आणि उपयोगी होईल, असें मला वाटते, ह्मणून तिजविषयीं आणखी सांगतों. धाकटया बहिष्णीला मूठमाती दिल्ह्मावर सुमारें एक सतकाने मी त्या कुटुंबाला भेटायास गेलों. त्यांच्या घराचा रस्ता आडवळणी व अरुंद होता. त्याच्या दोहीं बार्जुस अनेक प्रकारची झाडे, जी आपले शेंडे कमानीसारिखे लववून वाटसरास सूर्याच्या क्रिारणांपासून झांकीत अर्सी होती. दोहींकडे सुंदर फुलें आणि लहान झाडे व झुडपें वाढलीं होतीं. आणि ठिकाणेठिकाणीं वेडेवांकडे खडक आणि त्यांपासून पाण्याचे लहान झरे वाहत होते. ही सर्व रचना अड्डुत आणि