Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपदेशक जाण्यास मान्य होती. 3 झालें आहे. परंतु ईश्वराच्या कृपेने माझ्या बहिणी चा जो तारणारा तो माझाहि तारणारा होईल असो माझी आशा आहे. मी केवढी पापी, मी किती लाचार आहे; असें मनांत आणून तिने तारणासाठीं रद्दोस्तावर आशा धरिली.

  • महाराज, आतां ती मेली आहे. तिचे मन देवाकडे फिरावें ह्मणून तिची बहीण जी प्रार्थना करीत असे तो सफळ झाली, असा मला भरवसा आहे.”

असे संभाषण झाल्यावर त्या सगुणीची विनंती पूर्ण करावी आणि तिला भेटावें ह्मणून मी फार उत्कंठित झालों, आणि शुक्रवारीं नेमलेल्या वेळेस मी येते, असें त्या ह्याता-या गवळ्यास वचन दिल्हें मग (याच्या संकटाविषयों कांहीं संभाषण झाल्यावर तो गेला. तो ह्यातारा सन्मान्य माणूस होता. सुरकुतलेले गाल व पिकलेले केंस व अथूनी भरलेले डोळे व लवलेले खांदे आणि अशतपणाने चालणें हीं त्या ह्माता-या गवळ्याचीं लक्षणें होतीं.