Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ट्टीघा बहिणीच संभाषण. र्य वाटले. तो पहिल्यापेक्षां अगदीं वेगळी झाली. आणि तिचा स्वभाव व वर्तणूक नम्र, सौम्य आणि कृपाळू असतां, तो आमच्या शरीराच्या व आत्म्याच्या कल्याणाविषयीं इतकी उत्कंठित होती कीं तिच्यासंगतीं असावे यांत आह्माला फार सुख वाटलें, आणि आमची असी खातरी झाली की हा तिचा धर्म खरा आहे, नाहीं तर तिचा स्वभाव एकाएक असा बदलला नसतT. ' या वेळेस तिची धाकटी बहीण हसून व थट्टा करून तिला ह्मणे कीं, ' ताई, या नव्या धर्माकड़न तुझे डोकें फिरलें. तेव्हां तो ह्मणे, 'नाहीं नाहीं, माइया प्रिय बहिणी, माझे डोक्रे नव्हे, परंतु माझें अंत:करण पापापासून ईश्वराकडे फिरलें आहे, असें मला वाटतें. हलों तुझी अवस्था केवढी भयाची आहे हे जसे मला दिसर्ते, तसे तुलाहि दिसून यार्वेि, असी माझी फार इच्छा आहे.' 'तिची लाचार बहीण ह्मणे कीं 'तुझा उप देश ऐकावा असो माझी इच्छा नाहीं. मी