Jump to content

पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गवळी व उपदेशक यांचे सभाषण, 3. लिहिणारी ही हलक्या कुळांतली आहे, असे दिसले, तरी त्या पत्रांतील हसिलावरून ती फार धार्मिक आहे असे समजण्यांत आले. आणि या देशांत असे लोक थोडकेच आहेत ह्मणून तिजविषयी मला आश्चर्य वाटले. तें पत्र वाचल्यावर हें कोणी आणिलें, ह्मणून म्या पुसले. तेव्हां तो दारासीं उभा आहे असें कोणी एकाने सांगितलें. मग मी याकडे गेलों. तो मायूस फार सन्मान्य व ह्यातारा असा दिसला. त्याचा चेहरा सुरकुतलेला आणि केंस पिकलेले व लांब होते. त्याने आपले हात दारासीं टेकले होते आणि त्याच्या गालांवरून असवें वाहत होतीं. त्याने मला पाहून सलाम केल्या आणि ह्मणाला, 'महाराज, म्या आपल्या कन्येकडून पत्र आणिलें. परंतु मला भय वाटते की आपल्यास आही असे श्रम देतों यावरून, हे किती अविचारी आहेत, असें कदाचित्र आपल्यास वाटेल.' भी ह्मणालों, ‘ नाहीं, नाहीं. यावयास मी