पान:गद्यरत्नमाला.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संतोष

१३९


गाढ झोप येते. श्रीमंताच्या स्थितीच्या दोन्ही बाजू गरीब पहात नाहीत; त्यामुळे ते हेवा करितात; वस्तुतः खरें सुख तेथे राहतें असें नाहीं.
 संपत्ति नसल्यामुळे असंतुष्ट असणारे फार; याकरितां त्यावि- सांगितलें परंतु याशिवायहि आणखी असंतोषाची कारणें पुष्कळ आहेत. कित्येकांस आपणास मान बरोबर मिळाला नाहीं ह्मणून असंतोष होतो; कोणी लोकांनीं आपला उपमर्द केला ह्मणून खटू होतात; या सर्वोचें कारणही ते आपल्या स्थितीचा योग्य विचार करीत नाहींत हेंच होय. कित्येक वेळां तर असंतोषास कांहींच कारण नसतें. पुष्कळ लोक आपली योग्यता वाजवीपेक्षां जास्त समजतात; व त्या जास्त समजलेल्या योग्यतेप्रमाणें मान- मिळाला नाहीं म्हणजे असंतुष्ट होतात. कित्येकांच्या अंगीं शांति नसल्यामुळे अंमळ कोणीं कांहीं बोललें तरी सहन न होऊन त्याचें मन असंतुष्ट होतें. ते सुद्धां आपल्या स्थितीचा पूर्ण विचार करीत नाहींत, असें म्हटलें पाहिजे. आपले हातून किती अपराध होतात, किती वाईट कृत्ये होतात, हें मनुष्यानें मनांत आणले तर दुसऱ्याच्या यःकश्चित् अपराधानें मन क्षुब्ध करणें हा मूर्खपणा आहे, असें त्यास वाटेल. असंख्यात घोर अपराध करून ईश्वरानें आपली क्षमा करावी असें लोक इच्छितात, तेच दुसऱ्यानें लहानसा अपमान केला तरी मनांत खिन्न होतात; व अंगीं सा- मर्थ्य असल्यास कदाचित् त्याचा सूडसुद्धां उगवितात, हा मनुष्य- जातीम लज्जा आणणारा दुर्गुण होय. या सर्व गोष्टीचे आदिका - रण असंतोष हैं होय. ज्याच्या अंर्गी संतोष नाहीं, त्यापाशीं दया, शांति, हे सगुण कधीं रहावयाचे नाहींत.
 वरील लेखाचें ताःपर्य आपली स्थिति सुधारण्यास कोणीं उ- द्योग करू नये, अथवा कोणी मुद्दाम विनाकारण अपमान केला तरी सोसून घ्यावा, असें नाहीं. याचे तात्पर्य असें समजावयाचें कीं, कांहीं हित नसतां उगाच अंगीं दुर्गण वाढविणारा असंतोष