पान:गद्यरत्नमाला.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



संतोष.

१३७


 संतोष हैं सद्गुण संपादण्यास मुख्य साधन आहे. मनुष्यानें एकंदर आपल्या स्थितीचा पूर्ण विचार केला पाहिजे. पशुपक्ष्यां- प्रमाणे रोजच्या रोज भक्ष्य पैदा करून निर्वाह करावा लागता तर आपली काय दुर्दशा झाली असती ! किंबहुना अशा स्थि तत मनुष्यासारख्या दुर्बल प्राण्याचें जीवनसुद्धां होणार नाहीं. ज्या कला आपण कधीं ऐकिल्या नाहींत, अशा कलांनीं उत्पन्न झालेले पदार्थ आपणास थोड्या श्रमानें अथवा थोड्या पैशानें सहज प्राप्त होतात, हें सुख लहान आहे काय ? ह्रीं सर्व साधनें नसती तर आपणांस किती दुःख झालें असतें ? वास्तविक पाहतां निर्वाहास पाहिजे त्यापेक्षां ईश्वरानें मनुष्यास पुष्कळ दिलें आहे.
 असंतोषी मनुष्यास केवढाहि लाभ झाला असतां तो आनंदी होत नाहीं, परंतु थोडासा नाश झाला तरी त्याचें मन अस्वस्थ होतें. तो नेहमीं आपणांपेक्षां जे अधिक सुखी दिसतात त्यांची स्थिती मनांत आणून आपणांस ती नाहीं ह्मणून दु:खी असतो. परंतु आपणापेक्षां फार वाईट ज्यांची स्थिती आहे, त्यांविषय तो कांहींच विचार करीत नाहीं. वास्तविक पाहतां मनुष्याच्या निर्वाहास लागणारे वस्त्रपात्र बहुशः सर्वोस मिळण्यासारखें असतें, परंतु त्याचा स्वभाव नेहमी इतरांकडे पाहण्याचा असतो, यामुळें तो कधींच सुखी होत नाहीं.
 कोटीची दौलत असूनहि मनुष्य संतुष्ट नसेल तर त्यास सुखी कोण ह्मणेल ? जो संतुष्ट तोच खरा सुखी होय. पदरीं श्रीमंती असली तरी सुख नाहीं असे पुष्कळ लोक आहेत. श्रीमंतांच्या पाठीमागे हजारो झटे असतात. बाहेरून वस्त्रपात्राची छानछुकी असली तरी तीपासून श्रीमंताच्या मनास विशेष सुख होतें असें नाहीं. एकंदरीत पाहतां गरीबीपासून होणाऱ्या दुःखापेक्षां श्रीमं- तीपासून होणारी दुःखें पुष्कळ व भयंकर होत. फार काय, पण श्रीमानाच्या मूर्खपणानें व हट्टानें राष्ट्रेंसुद्धां बुडालीं आहेत ! खरी संपत्ति ाटली म्हणजे संतोष ही, व असंतोष हैं दारिद्र्य होय,